🌟मुख्यमंत्री फडणवीस यांनी मा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितलेला राजधर्म आठवावा - ॲड.प्रकाश आंबेडकर


🌟मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजधर्माचे पालन करुन संभाजी भिडेंना तात्काळ अटक करावी असेही आंबेडकर म्हणाले🌟 

मुंबई : - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितलेल्या राजधर्माचे पालन करुन संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी आज गुरुवार दि.२७ मार्च रोजी एका पत्रकार परिषदेत केली यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगाव प्रकरणा सारखी चूक पुन्हा करु नये असी मागणीही ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना केली.

रायगडावरील शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन वाद सुरु आहे. याविषयी पत्रकारांशी बोलतांना ॲड.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितलेला राजधर्म आठवावा. जो कोणी राजदंड हातात घेतो, त्याला राज्य चालवता आलं पाहिजे. जो कोणी कायद्याला मानत नसेल त्याला आतमध्ये तुरुंगात टाकण्याची संधी असली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगावच्या वेळेस संभाजी भिडेंना पाठिशी घातलं, एकप्रकारे बळ दिलं. ती चूक आता पुन्हा करु नका, ही माझी अपेक्षा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. भाजपकडून रमजान ईदच्या मुहूर्तावर देशातील मुस्लीम समुदायाला ३२ लाख सौगात-ए-मोदी किट वाटण्यात येणार आहेत. या किटमध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ आणि कपडे असणार आहेत. यावरुन प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला - लक्ष्य केले. इतर पक्ष वाटप करतात आणि भाजप आरएएस करते तेव्हा वेगळा संदर्भ येतो. १९९९ - पासून सत्तेत आल्यापासून टी मुस्लिम भूमिकेचा स्टँड राहिलेला आहे. गोध्रा घडवण्यात आलेलं आहे. रेल्वेचे डब्बे जुने घेतले, जळाले नाही आणि आतून जळालेत. २०१४ मध्ये सत्तेत - आल्यानंतर अखलाक, शाबीर यांचे मॉब लिंचिंग केलं जातं आणि त्याचे व्हीडिओ आपल्याला - मिळतात. मुस्लिमांना साईडट्रॅक करायचं, हा भाजप आणि आरएसएसचा प्रयत्न आहे. त्यामुळे - सौगात ए मोदी कार्यक्रम येतो तेव्हा शंका येते. हा राजकीयदृष्टीनं केलेला हा कार्यक्रम आहे. २२ टक्के हिंदू बाहेर जाऊ पाहात आहे, अशात मतदार जात असल्याने हे कृत्य केले जात आहे. - मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन सुरु आहे. मौलवींनी भूमिका घेतली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे ही किट घ्यायची की नाही असे प्रकाश आंबेडकर अशी भूमीका त्यांनी यावेळी मांडली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या