🌟व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने नोंदवला बंदमध्ये सहभाग🌟
पुर्णा :- पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे काल गुरुवार दि.२० मार्च २०२५ रोजी ताडकळसवासियांनी सोशल मिडीयामधून वारंवार होणार्या उदात्तीकरणाच्या आक्षेपार्ह पोस्टच्या निषेधार्थ स्वयंस्फूर्तीने बंद पाळला या दरम्यान छोटे मोठी सर्व दुकाने दिवसभर बंद होती व्यापार्यांनी या बंदमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला.
दरम्यान, सरपंच गजाननराव आंबोरे, बाजार समितीचे सभापती बालाजी रुद्रवार, माजी सभापती रंगनाथराव भोसले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुधा पाटील आंबोरे, माजी उपसरपंच सैजूभैय्या शेख, सामाजिक कार्यकर्ते फेरोज पठाण आदींनी गावात सामंजस्य रहावं या दृष्टीने प्रयत्न केले. कोणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व प्रतिक्रिया नोंदवू नयेत, असे आवाहनही गावातील ज्येष्ठ नेतेमंडळी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे. दरम्यान, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी व ताडकळस पोलिसांनीसुध्दा सोशल मिडीयातील फेक न्यूज, आक्षेपार्ह पोस्ट कोणीही व्हायरल करु नयेत, असे आवाहन केले. जो कोणी भावना दुखावणार्या पोस्ट करेल त्याच्या विरोधात कठोर पाऊले उचलली जातील, असा इशाराही प्रशासनाने दिला.
0 टिप्पण्या