🌟वाशिम जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती....!

 


🌟मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडल्यानंतर नवीन पालकमंत्री म्हणून भरणे यांची नियुक्ती🌟

मुंबई : वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद हसन मुश्रीफ यांनी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता वाशिम जिल्ह्याला नवे पालकमंत्री मिळाले आहे राज्याचे क्रिडा युवक कल्याण व अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक व रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना कोल्हापूरचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतला. मुश्रीफ यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. सहावेळा आमदार राहिलेले हसन मुश्रीफ यांच्याकडे फक्त तीन आमदार असलेल्या वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले होते. कोल्हापूरचे आमदार आणि मंत्री असलेले मुश्रीफ यांना ज्या जिल्ह्याच पालकमंत्री पद देण्यात आले तो वाशिम जिल्हा बराच दूरचा आहे. कोल्हापूर ते वाशिम हा प्रवास जवळपास ६०० किलोमीटरचा आहे. त्यामुळे वाशिमचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर त्या ठिकाणी येण्याजाण्यासाठी मुश्रीफ यांचे प्रवासात जवळपास दोन दिवस जात होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या