🌟महाराष्ट्र रत्न पुरस्कार शिक्षक अरविंद उबाळे यांना जाहीर.....!


🌟साऊ ज्योती सामाजिक ‌फाउंडेशन महाराष्ट्र राज्यच्या वतीने दि.२३ मार्च रोजी पुण्यात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार पुरस्कार🌟 

परभणी :- ठाणे वीज इंग्लिश हायस्कुल चे शिक्षक,बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद उबाळे यांना पुणे येथील साऊ ज्योती सामाजिक ‌फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने देण्यात‌ येणारा महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे.आपल्या श्रेष्ठता शैक्षणिक व सामाजिक फाउंडेशन च्या माध्यमातुन अनेक  गरजु मुलांना ते मदत करत असतात..कोराेना काळात अनेक लहान मुलांना दूध,अनेक कुटुंबाना किराणा सामान देण्यासाठी पुढे आले. जसे जमेल तसे शाळेतील मुलांना शैक्षणिक साहीत्य दिले.ते स्वतःएक कवी असून त्यांच्या अनेक कविता,लेख वर्तमान पत्रातून प्रसिद्ध होत असतात.आपल्या लिखाणातून ते सामाजिक प्रबोधन करत असतात.बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या माध्यमातुन अनेक सामाजिक उपक्रम ते आपल्या सहकार्यातून राबवित असतात. कोणाच्याही अडीअडचणीला मदत करतात.

या सर्व कार्याचा विचार करून हा महाराष्ट्र रत्न पुरस्कार अरविंद उबाळे यांना दि.२३ मार्च २०२५ रोजी पुण्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह गंज पेठ पुणे येथे दुपारी १२ वाजेच्या सुमारास आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.पुणे येथील साऊ ज्योती फाउंडेशन च्या वतीने अरविंद उबाळे यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात असे नमुद करण्यात आले आहे की देशाच्या प्रगतीसाठी व राष्ट्राच्या हितासाठी सामाजिक उज्वल भवितव्यासाठी आपण अनेक क्षेत्रात गेल्या काही वर्षातील आपण केलेल्या सामाजिक ‌कार्य सातत्यपुर्ण उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन आम्ही साऊ ज्योती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या कार्य कर्तुत्वाला प्रोत्साहित करण्याचे कार्य करीत आहोत.पुरस्कार प्रेरणा देतात,प्रेरणेने राष्ट्र मोठे होते.या सुत्रावर आधारीत ‌महाराष्ट्र राज्य कार्य प्रती आपणास आम्ही फाउंडेशन ‌च्या माध्यमातून २०२५ करीता पुरस्कार जाहीर करत आहोत.

तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या