🌟परभणी जिल्ह्यातील सामाजिक/राजकीय व कृषी क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप सोडणारे माणिकराव सुर्यवंशी यांना राज्यस्तरीय पद....!


🌟मानवी हक्क संरक्षण संस्थेच्या राज्य सचिव पदावर माणिकराव सुर्यवंशी यांची नियुक्ती🌟

परभणी : परभणी जिल्ह्यातील सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रासह कृषी क्षेत्रातही आपल्या विविध लोकहीतवादी आंदोलनांतून कर्तृत्वाची अमिट छाप सोडणारे पुर्णा तालुक्यातील मौजे निळा गावचे भुमि पुत्र तथा छावा मराठा युवा संघटनेत यशस्वी कारकीर्द गाजवलेले शिवसेना उबाठा पक्षाची युवक संघटना युवा सेनेचे पुर्व तालुकाप्रमुख/उपजिल्हा प्रमुख माणिकराव भीमराव सूर्यवंशी यांची नुकतीच मानवी हक्क संरक्षण संस्थेचे प्रदेश अध्यक्ष आर राकेश सिंह महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यशवंत थोरवत महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक अजित जी ढोले महाराष्ट्र राज्याचे सचिव वेंकटेशजी काळे पाटील यांनी मानवी हक्क संरक्षण संस्थेच्या राज्य सचिव पदावर नियुक्ती केली असून त्यांना संबंधित मान्यवरांनी शुक्रवार दि.२८ मार्च २०२५ रोजी नियुक्तीपत्र प्रदान केले.

माणिकराव सुर्यवंशी यांना मानवी हक्क संरक्षण संस्थेच्या राज्य सचिव पदावर नियुक्त केलेल्या नियुक्तीपत्रात असे नमूद करण्यात आले आहे की प्रारंभिक छाननीनंतर आम्ही दि.२८ मार्च २०२५ पासून तुम्हाला महाराष्ट्र राज्य सचिव म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या नियुक्तीचा कालावधी प्रथमतः सुरुवातीला एक वर्षासाठी असेल आणि तुमच्या एकूण कामगिरीचे आणि अद्वितीय क्षमतांचे मूल्यांकन आणि पुनरावलोकन केल्यानंतर आम्ही निश्चितच तुमची महाराष्ट्र राज्य उपसचिव (आजीवन) म्हणून नियुक्ती करू तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या सार्वजनिक कामांची माहिती दर महिन्याच्या शेवटी व्हाट्सॲप / ईमेल माध्यमातून आमच्या कार्यालयात नोंदवावी अशी आपणास विनंती आहे येथे हे लक्षात ठेवणे योग्य आहे की तुमच्या नियुक्तीनंतर तुम्ही सुरू केलेले कोणतेही प्रयत्न / क्रियाकलाप / कृती आमच्याकडून आदेशित होईपर्यंत पूर्णपणे तुमची जबाबदारी असेल आणि वरीलपैकी कोणत्याही उद्भवणाऱ्या जबाबदाऱ्यांपासून आम्ही स्वतःला मुक्त करतो. नियुक्त केलेल्या जबाबदारीच्या स्वीकृतीचे प्रतीक म्हणून नियुक्ती पत्राच्या प्रतीवर योग्यरित्या स्वाक्षरी करून तुम्हाला या नियुक्ती पत्राची पावती स्वीकारण्याची विनंती आहे असेही नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले असून माणिकराव सुर्यवंशी यांच्या कार्य कर्तृत्वाची दखल घेऊन मानवी हक्क संरक्षण संस्थेच्या राज्य सचिव पदावर नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या