(मोदीपुरम (मीरत, उत्तर प्रदेश) येथे मराठवाड्यातील ४ शेतकऱ्यांना उकृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान करताना मान्यवर)
🌟परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापिठाचे कुलगुरु प्रा.डॉ.इन्द्र मणि यांनी केले अभिनंदन🌟
पूर्णा (दि.१० मार्च २०२५) :- मराठवाड्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना मोदीपुरम (मीरत,उत्तर प्रदेश) येथील शेती पद्धती संशोधन आणि विकास मंडळाचे (FSRDA) राष्ट्रीय पातळीवरील उकृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.हा पुरस्कार सोहळा भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मोदीपुरम येथील भारतीय शेती संशोधन संस्थेमध्ये आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय एकात्मिक शेती पद्धती परिषदेच्या समारोप समारंभात (ता ०९) मार्च रोजी देशभरातील विविध राज्यातील उत्कृष्ट शेतकऱ्यांना मान्यवरांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून झाशी येथील आरएलबीसीएयुचे कुलगुरू तथा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक डॉ. पंजाब सिंह हे होते. सन्माननीय अतिथी म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, मीरत येथील एसव्हीपीएयुटीचे कुलगुरू माननीय डॉ. के. के. सिंह, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (कृषी विस्तार) माननीय डॉ. राजबीर सिंह, झाशी येथील आरएलबीसीएयुचे माजी कुलगुरू माननीय डॉ. अरविंद कुमार, भागलपुर बिहारच्या बीएयुचे माजी कुलगुरू माननीय डॉ. ए. के. सिंह, मोदीपुरम येथील भारतीय शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. सुनील कुमार,एकात्मिक शेती प्रकल्प चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ.आनंद गोरे आदी उपस्थित होते यावेळी परभणी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी पुरस्कार प्राप्त सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.
या पुरस्कारामध्ये प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेती करत असलेले प्रयोगशील शेतकरी प्रताप काळे (धानोरा काळे, ता. पूर्णा), ज्ञानोबा पारधे (बाभूळगाव, ता. परभणी),. जनार्धन आवरगंड (माखणी, ता. पूर्णा), . रत्नाकर ढगे (सायळ, ता. लोहा), यांचा उकृष्ट शेतकरी पुरस्कारात समावेश आहे. या कार्यक्रमात विद्यापीठाचे किटक शास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड,मुख्य शास्त्रज्ञ एकात्मिक शेती प्रकल्प चे डॉ.आनंद गोरे, शरद चेनलवाड, . अर्जुन जाधव, प्रगतशील शेतकरी बालासाहेब हिंगे, सुरेश शृंगारपुतळे तसेच महिला प्रगतशील शेतकरी सुषमा देव (हदगाव, जि. नांदेड), श्रीमती सरीता बारहाते (मानवत, जि. परभणी), वंदना जोगदंडे (सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर.) यांचीही उपस्थिती होती.
******************************************
💫डॉ.इंद्र मणी कुलगुरू वसंतराव नाईक कृषी विद्यापिठ परभणी
कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती चे कौतुक केले तर नविन शेतकरी जोमाने काम करतात आपले विक्रमी उत्पादन वाढवतात जेणे करून विक्रमी उत्पादनाचे फळ मिळते चांगले काम करणारे शेतकरी मोठया सन्मानाने भारावले.
0 टिप्पण्या