🌟यावेळी त्यांच्या सोबत धुळे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भदाणे पाटील हे पण उपस्थित होते🌟
नांदेड - धुळ्याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राम भदाणे पाटील यांचे काल नांदेड येथे आगमन झाले त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले राष्ट्रवादी मुखेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी आमदार भदाणे पाटील नांदेड येथे आले होते.
त्यांच्या सोबत धुळे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भदाणे पाटील हे पण उपस्थित होते. केवळ ३१ वर्ष वयात आमदार होण्याची संधी राम भदाणे पाटील यांना मिळाली असून त्यांचे आजोबा स्व. अण्णासाहेब भदाणे पाटील हे सतत ४ वेळा धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार राहिलेले आहेत. मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृतवाखालील विधिमंडळात सदस्य होण्याची आम्हाला संधी मिळाली या संधीचे नक्कीच सोने होईल असा आम्हाला विश्वास आहे असे आ.राम भदाणे पाटील म्हणाले. यावेळी त्यांच्या स्वागताला मुखेड तालुका राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार श्री पंढरीनाथ बोकारे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पार्टीचे नेताजी भोसले, संजय पवार, सरदार टेहल सिंघ,पत्रकार आयनाले सर, बॅरिस्टर राजीव जाधव, रवी जाधव, व्यंकटराव टेकाळे,नरसिंह जाधव, मारोतराव डक पाटील,अविनाश जाधव उपस्थित होते......
0 टिप्पण्या