🌟उमरी ते शिर्डी पदयात्रे चे नांदेड शहरात आगमन : ठिक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद....!


🌟नांदेड शहरात विविध सामाजिक धार्मिक संस्थांकडून यात्रेचे ठिक ठिकाणी उत्स्फूर्त असे स्वागत करण्यात आले🌟


नांदेड
- संत श्री दासगणू महाराज यांच्या कृपा आशीर्वाद लाभलेल्या उमरी ते शिर्डी पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून काल रविवारी यात्रेचे नांदेड शहरात आगमन झाले विविध सामाजिक धार्मिक संस्थांकडून ठिक ठिकाणी उत्स्फूर्त असे स्वागत करण्यात आले.

मराठवाड्यातुन मानाची असलेली उमरी ते शिर्डी ही पदयात्रा पालखी स्वरूपात असून मागील १४  वर्षापासून यात्रेचे आयोजन करण्यात येते. आनंदी दास देशमुख यांनी बाबा टायर्स येथे साईं पालखीचे पुष्पवृष्टी करून मोठे स्वागत केले...चहा, बिस्कीट अल्पोपहार देऊन आशीर्वाद घेतला. दरम्यान यात्रा झुलेलाल बाबा मंदिर येथे नतमस्तक झाली. वाजेगव येथे खा रवींद्र चव्हाण यांनी यात्रेला भेट दिली. यात्रेचे त्यांनी स्वागत केले. शिवाजीनगर येथील श्री हनुमान मंदिर येथे पालखीची आरती करण्यात आली, स्वागत झाले. साई भक्त तथा नांदेड मर्चंट को ऑपरेटिव्ह सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते व नानक साई फाऊंडेशन चे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांच्या वतीने यात्रेचे अध्यक्ष गोपाल राठोर, कार्यकारी अध्यक्ष अशोक मामीडवार, उपाध्यक्ष महेश नग्नूरवार (हुंडेकर), कृष्णा देशमुख,संदीप लापशेतवार यांचे प्रातिनिधिक स्वागत केले.  जवळपास पंधरा दिवस चालणारी ही पदयात्रा रामनवमीच्या दिवशी शिर्डी येथे दाखल होणार आहे. शिर्डी येथे शिर्डी संस्थानच्या वतीने यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात येते. श्री संत कवी दासगणु महाराज साई भक्त मंडळ गोरटे संचलित पालखीत जवळपास सव्वाशे भाविक भक्त सामील झाले आहेत. पालखी समितीचे मुख्य प्रर्वतक विष्णूभाऊ अट्टल हे असून यांच्या देखरेखित पालखी पुढे जात आहे. दरम्यान रविवारी ही यात्रा नांदेड येथे चांदोजी पावडे  मंगल कार्यालयात मुक्कामाला होती. आज सोमवार रोजी सकाळी निळा मार्गे वसमतला रवाना होणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या