🌟महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार २०२५ सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले🌟
पुर्णा (दि.२३ मार्च २०२५) पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथून जवळच असलेल्या महातपुरी येथील पत्रकार सचिन सोनकांबळे यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार २०२५ सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
सर्वांच्या सेवेसाठी महाराष्ट्राच्या हितासाठी नवयुवकांनी चालवलेली राज्यव्यापी सामाजिक चळवळ सामाजिक चळवळ मानबिंदू असलेल्या तसेच कार्याचा, कर्तुत्वाचा, गुणाचा सन्मान करण्याचे उद्देशाने साऊज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा सन्मान सोहळा मराठी इतिहास संशोधन मंडळ १३२१ सदाशिव पेठ पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन हळदे,उद्घाटक प्रिया थोरात, कार्यक्रमाचे अध्यक्ष रामजीत म. गुप्ता, प्रमुख मार्गदर्शक संतोष जाधव, कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक चित्रा दीक्षित तसेच संगीता ढोले , नीलिमा ताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आम्रपाली पारवे,प्रविनताई पानसरे,डॉ.अंजना खताळ, नीता शेळके यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र रत्न राज्य स्तरीय पुरस्कार सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.....
0 टिप्पण्या