🌟देशासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा : सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटवले....!


🌟येत्या १ एप्रिल पासून निर्यात शुल्क शून्य टक्के होणार आहे🌟

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क केंद्र सरकारने हटवले आहे येत्या १ एप्रिल पासून निर्यात शुल्क शून्य टक्के होणार आहे.

या निर्णयामुळं कांदा निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव सातत्याने घसरत असल्यानं शेतकर्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. उन्हाळी कांदा बाजारात येणार असल्याने येत्या काळात आणखी भाव खाली जाण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, अशातच केंद्र सरकारच्या या निर्णययाने शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून कांद्यावरील निर्यात शुल्क हटवावे अशी मागणी केली जात होती. निर्यात शुल्क लावल्यामुळं कांद्याच्या दरावर परिणाम होत होता. याचा फटका शेतकर्यांना बसत होता. अखेर आज केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील २० टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या