🌟राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली निर्णयाची घोषणा🌟
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील विविध घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करण्यासाठी आता मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घेतला आहे.
पंतप्रधान आवास योजनेसह रमाई घरकुल योजना व अन्य योजनांतर्गत घर बांधणाऱ्यांना आता महसूल प्रशासन शासकीय नियमानुसार पाच ब्रास वाळू मोफत देण्याच्या निर्णयाची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा घरकुल बांधत असलेल्या लाखो लोकांना होण्याची शक्यता आहे. "ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाहीत, ज्या ठिकाणी आम्हाला एन्व्हायरमेंट क्लियरन्स मिळाला आहे, त्या ठिकाणी वाळू घाटांचे लिलाव होईल. तसेच घरकुलांना पाच ब्रास मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यासाठीही आम्ही तरतूद करणार आहोत," अशी माहिती त्यांनी दिली.
"एकंदरीत जेवढी मागणी असेल, तेवढा पुरवठा असे वाळू धोरण आपण तयार करत आहोत. त्यासाठी एम सँड धोरण येत आहे. त्यामध्ये दगड खाणींमधून येणाऱ्या वाळूसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टो क्रशरसाठी प्रोत्साहन देत आहोत. त्या माध्यमातून दगडापासून मोठ्या प्रमाणात वाळू तयार होणार असून, त्यामुळे नदीतील वाळूची मागणी कमी होईल. तसेच येत्या दोन वर्षात वाळूची मागणी आणि पुरवठा यामध्ये जी काही तफावत आहे ती दूर होईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले....
0 टिप्पण्या