🌟मुंबईत होणार 19 मार्च रोजी आंदोलन : शेतकरी अरबी समुद्रात सातबारे बुडवून कर्जमुक्त झाल्याची घोषणा करणार🌟
🌟सोयाबीन -कापूसही अरबी समुद्रात फेकणार🌟
✍️ मोहन चौकेकर
बुलढाणा : - (दि.12 मार्च 2025 ) - शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, पिकविमा, सोयाबीनचा -कापसाचा भावफरक यासह सोयाबीन- कापूस, ऊस, कांदा, धान, दूध उत्पादकाना मदत व भाववाढ आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी 19 मार्च रोजी मुंबईत धडक देणार आहेत. शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात अरबी समुद्रात सातबारे बुडवून शेतकरी कर्जमुक्त झाल्याची घोषणा करणार आहेत तसेच सोयाबीन कापूस बुडवून शासनाचे लक्ष वेधणार आहेत. या आंदोलनाची उस्फुर्त तयारी करण्यात येत असून गावागावातील शेतकरी मुंबईला जाण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. 18 मार्च रोजी सकाळी 9 वाजता बुलडाणा शहरातील क्रांतिकारी हेल्पलाइन सेंटर वरून शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात सर्व शेतकरी मुंबईकडे आगेकूच करणार आहेत.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पुणे येथील 03 मार्च रोजी पार पडलेल्या राज्यव्यापी बैठकीत शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 19 मार्च रोजी मुंबईत आंदोलनाचा बॉम्ब फोडणार असल्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकविमा, सोयाबीन- कापूस भावफरक, नाफेड मध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम, रखडलेले अनुदान, ऊसाला एकरकमी एफआरपी द्यावी यासह कांदा, दूध, धान व इतर उत्पादनाना मदत मिळण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी मुंबईत धडक देण्याचा इशारा शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता. 18 मार्चपर्यंत त्यांनी सरकारला वेळ दिला होता, परंतु अद्याप सरकार कडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद नसल्याने शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनाची ठाम भूमिका घेतली आहे. 19 मार्च रोजी मुंबईतील नरिमन पॉईंट येथे अरबी समुद्रात आपले सातबारे बुडवून शेतकरी स्वतःला कर्जमुक्त झाल्याचे घोषित करणार आहेत तसेच सोयाबीन आणि कापूस समुद्रात बुडवून शासनाचे लक्ष वेधणार आहेत. या आंदोलनासाठी गावागावातून शेतकरी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता आहे . 18 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता बुलढाणा येथील क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या हेल्पलाइन सेंटर समोर सगळे शेतकरी एकत्र जमणार आहेत व तेथून शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मुंबईकडे आगेकूच करणार आहेत. रात्री मुंबईच्या वेशीवर मुक्काम करून 19 मार्च रोजी सकाळी शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तूपकरांचे नेतृत्वात सगळे शेतकरी नरिमन पॉईंट येथे अरबी समुद्रावर पोहोचणार आहेत. आम्ही शांततेच्या मार्गाने आमचा हक्क मागण्यासाठी जात आहोत त्यामुळे पोलिसांनी उगीच आडवा - आडवी करू नये, आम्हाला मुंबईत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशाराही शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. यापूर्वी ज्या ज्या वेळी रविकांत तुपकरांनी मुंबईत शेतकऱ्यांसह धडक दिली त्या त्यावेळी शेतकऱ्यांच्या पदरात काही ना काही पडले आहे. गत वेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलेल्या आंदोलनामुळे AIC कंपनीने सन 2023 च्या खरीप हंगामातील पात्र दोन लाख 24 हजार 482 शेतकऱ्यांच्या खात्यावर 135 कोटी 51 लाख रुपये पिक विमा जमा केला होता तर रब्बी हंगामातील पात्र शेतकऱ्यांना 125 कोटी 22 लाख रुपयांचा पिक विमा मिळाला होता. रविकांत तुपकरांचे बहुतांश आंदोलने सफल होऊन शेतकऱ्यांना मदत मिळाल्याचे यापूर्वी काही वेळा सिद्ध झाले आहे,भांडल्या शिवाय काही मिळत नाही, घरात बसून न्याय मिळणार नाही,त्यामुळे आपला हक्क मिळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मुंबईच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केले आहे.....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या