🌟पाकिस्तानी लष्करावर बलूच लिबरेशन आर्मीने केला आत्मघातकी हल्ला.....!

 


🌟या हल्ल्यात ९० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा 'बीएलए' ने केला आहे🌟

इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्करावर बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) काल रविवार दि.१६ मार्च २०२५ रोजी आत्मघातकी हल्ला केला या हल्ल्यात तीन पाक लष्कराचे जवान व अन्य दोघे जण ठार झाल्याची पुष्टी पाकीस्तानी लष्कराने केली असली तरी या हल्ल्यात ९० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा 'बीएलए' ने केला आहे.

 क्वेटाहून कफ्तानला जाणाऱ्या ८ लष्करी वाहनांवर नोशकी येथील महामार्गावर आत्मघातकी हल्ला झाला. 'बीएलए'च्या माहितीनुसार, त्यांच्या मजीद आणि फतेह ब्रिगेडने लष्कराच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला. आत्मघातकी हल्लेखोरांची गाडी लष्कराच्या ताफ्यावर धडकली. त्यानंतर फतेह पथकाने लष्कराच्या ताफ्यात घुसून हल्ला केला. ज्या वाहनावर हल्ला केला, ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. जखमींना नोशकी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या भागात आता आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

पाकिस्तानी पोलिसांनी सांगितले की, रस्त्यावर पडलेल्या एका बॉम्बचा स्फोट झाला. त्यात सैनिकांना घेऊन जाणारी बस बळी ठरली. त्यात ३ पाकिस्तानी सैनिक व अन्य दोन जण मारले गेले, तर १० जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.बीएलए'ने ५ दिवसांपूर्वी प्रवासी ट्रेनचे अपहरण केले होते. त्यातील २१४ पाकिस्तानी लष्कराशी संबंधितांना ठार केल्याचा दावा 'बीएलए'ने केला होता.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या