🌟परभणीत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास मार्ग आयोजित विभागीय कृषी महोत्सवात सौ.स्वाती राजेंद्र घोडके यांचा सन्मान...!


🌟सौ.स्वाती राजेंद्र घोडके सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा कृषी माऊली पुरस्काराने सन्मानित🌟



परभणी :- परभणी येथे होत असलेल्या श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) व्दारा आयोजीत विभागीय कृषी महोत्सव दिनांक 8 मार्च ते 10 मार्च ठिकाण प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम मैदान परभणी, कार्यक्रम अंतर्गत सौ. स्वाती राजेंद्र घोडके सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी, कृषी विभाग स्मिता सोळंकी, पपीता गोरखेडे व.ना.म.क्र विद्यापीठ परभणी,विजय जंगले पेडगाव प्रगतशील शेतकरी यांना कृषि क्षेत्रात महिला सक्षमीकरण महिला गट स्थापन करून महिलांना गृह उद्योग विषयी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन तसेच सर्व शेतकरी बांधवांच्या संपर्कात राहून सर्वांना कृषी विभागा विषयी योग्य मार्गदर्शन करून कृषी विभागाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी चे कार्यक्रम यशस्वीरित्या तसेच नियोजनबद्ध राबवून  उल्लेखनीय कामगिरीबद्दल केल्याबद्दल *कृषी माऊली पुरस्कारासाठी* निवड करून दिनांक 8 मार्च महिला दिनानिमित्त गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे श्री. स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट दिंडोरी जिल्हा नाशिक, माजी खासदार शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी, डॉ.संप्रिया राहुल पाटील विभाग प्रमुख आयोजक संदीप देशमुख, समन्वयक बाळासाहेब शिंदे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सौ. स्वाती राजेंद्र घोडके यांना कृषी माऊली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या