🌟संयुक्त अरब अमिरातीमध्ये आणखी दोन भारतीयांना फाशीची शिक्षा....!


🌟फाशीची झालेले मोहम्मद रिनाश अरंगिलोट्ट आणि मुरलीधरन पेरुमथट्टा वलाप्पिल हे दोघेही केरळ राज्यातील🌟

अबुधाबी : संयुक्त अरब अमिरातीमध्ये आणखी दोन भारतीय नागरिकांना फाशी देण्यात आली असून हे दोघेही नागरीक केरळ राज्यातील आहेत या दोघांनाही हत्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते २८ फेब्रुवारी २०२५ रोजी संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांनी भारतीय दूतावासाला कळवले की दोघांनाही फाशी देण्यात आली आहे. दोघेही केरळचे रहिवासी असून मोहम्मद रिनाश अरंगिलोट्ट आणि मुरलीधरन पेरुमथट्टा वलाप्पिल अशी त्यांची नावे आहेत.

 भारतीय दूतावासाने त्यांच्या दयायाचिका आणि माफीसाठी अपील केले होते. परंतु 'यूएई' सर्वोच्च न्यायालयाने त्यांची मृत्युदंडाची शिक्षा कायम ठेवली. प्राप्त माहितीनुसार, रिनाश हा 'अल ऐन' मधील एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करत होता. त्याने यूएईच्या एका नागरिकाची हत्या केली होती, तर मुरलीधरनला एका भारतीय माणसाच्या हत्येप्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या