🌟पुर्णा येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा.....!


🌟ग्राहकांनी डोळसपणे खरेदी करावी - जनार्धन आवरगंड


पुर्णा
:- पुर्णा येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्धन आवरगंड यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत कार्य तक्रार तक्रारी वरचे निराकरण अखिल भारतीय ग्राहक पंचायत याचे उगमस्थान व ग्राहकांचे होणारे नुकसान फसवणूक यावर डोळसपणे खरेदी करावी व कुठल्याही फसव्या जाहिरातींना बळी पडू नये ग्राहकांनी अतिशय जागरुकपणे खरेदी करावी. कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये. पासवर्ड कुणालाही शेअर करु नये. आपले आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावे अशी माहिती दिली


तहसील कार्यालयात आज.नायब तहसीलदार सतीश नाईक.यांच्या मार्गदर्शनाने आज दिनांक २१डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्धन आवरगंड प्रमुख पाहुणे तालुका संघटक. शिवाजी.शीराळे.सुनीताताई सोनवणे संजय  अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पदाधिकारी उपस्थित होते प्रमुख मार्गदर्शन वितरण महामंडळाचे अविनाश.रामगिलवार  आरोग्य विभागाचे मेडिकल ऑफिसर डॉ. मोहिनी कदम यांनी आरोग्य विभागाच्या  ज्या काही योजना असतील यावर आपले मार्गदर्शन केले वैशाली कांबळे कीटक शास्त्रज्ञ सी. एन लेडाळे. विस्तार अधिकारी पंचायत समिती पूर्णा.  प्रवीण काळे मंडळ अधिकारी कृषी विभाग पुरवठा निरीकक्ष.प्रदीप मोरे तालुका गोदाम व्यवस्थापक तेजस कर्डक गोदामपाल गंगाधर. सातपुते यासह दुकानदार मेडिकल वाले इत्यादींसह अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते. सर सूत्रसंचालन व आभार प्रदीप मोरे यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या