🌟परभणी जिल्हा पोलिस प्रशासनाकडून सोशल मिडीयाचा गैरवापर केल्याबद्दल २१ जणांवर कारवाई....!

 


🌟तर ५७ व्यक्तींना नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाने दिली आहे🌟


परभणी (दि.२२ मार्च २०२५) : परभणी जिल्हा पोलिस प्रशासनाकडून सोशल मिडीयाचा गैरवापर केल्याबद्दल २१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई तर ५७ व्यक्तींना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाने दिली.

               विविध धार्मिक व राजकीय मुद्यांवरुन सोशल मिडीयावर केलेल्या वादग्रस्त पोस्ट, कमेंट करणार्‍यांना पोलिस अधिक्षक कार्यालयात बोलावून तंबी देण्यात आली. राज्यात सध्या औरंगजेबच्या कबरीवरुन वादंग उठले आहेत, त्याचा सोशल मिडीयावर मोठा परिणाम दिसतो आहे. जिल्ह्यात सायबर पोलिस स्टेशनसह सर्व पोलिस ठाण्यातून सोशल मिडीया मॉनिटरींग सेलची स्थापना करण्यात आली असून या सेलच्या माध्यमातून विविध टुल्स व हॅशटॅगचा वापर करण्यात येत आहे. सायबर पोलिसांचा सोशल मिडीया सेल सतर्क झाला असून वादग्रस्त पोस्टवर लक्ष ठेवून अनुचित प्रकार करणार्‍या प्रोफाईलधारकाची माहिती तात्काळ मिळवत आहे, असे अधिक्षक कार्यालयाने म्हटले.

              दरम्यान, गंभीर प्रकरणात वादग्रस्त पोस्ट व कमेंट करणार्‍या चार जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच २१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून ५७ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या