🌟मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथी गृह येथे सन्मानपूर्वक बोलवून दिले कारवाईचे लेखी आदेश🌟
परभणी :- परभणी येथील संविधान प्रतिकृती विटंबनेनंतर झालेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी केलेल्या मारहाणीत भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांचा कारागृहात मृत्यू झाला होता तर लोकनेते विजय वाकोडे यांना मनस्ताप सहन न झाल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन दुर्दैवी मृत्यू ओढवला होता यावेळी परभणी पोलिस प्रशासनाने कोम्बिंग ऑपरेशन राबवून अनेकांवर गुन्हे दाखल केले यावेळी अनेक निरपराधांना मारहाण देखील झाली या सर्व घटनांच्या विरोधात आशिष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरवादी जनसमुदायाकडून परभणी ते मंत्रालय मुंबई अशा लॉन्ग मार्चचे आयोजन करण्यात आले अखेर या लॉन्ग मार्च समोर सरकारला झुकावेच लागले लॉन्ग मार्च मुंबईत पोहोचल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लॉन्ग मार्चचे मुख्य संयोजक आशिष वाकोडे व सहकाऱ्यांना आपल्या सह्याद्री अतिथी ग्रहावर सन्मानपूर्वक बोलावून त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचं लेखी स्वरूपात दिल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी स्वरूपात दिलेल्या आश्वासनात सर्व मागण्यांचा विशेष उल्लेख करून पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिल्याने या प्रकरणातील आरोपीत पोलिस अधिकारी/कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई निश्चितच होणार यात तिळमात्र शंका नाही यावेळी 'लॉन्ग मार्च' मधील शिष्टमंडळाशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमच्यावर एवढ्या वेळेस विश्वास ठेवा आम्ही कोणत्याही दोषी पोलिस अधिकारी/कर्मचाऱ्यांना सोडणार नाही असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं परभणी घटनेनंतर दि.११ तारखेपासून अचलिया आयोगाकडून जी चौकशी सुरु आहे ती चौकशी एक दिवस अगोदर म्हणजे १० तारखेपासून करण्यास अचलिया यांना तात्काळ फोन करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः सांगितलं संविधान प्रतिकृती विटंबनेतील समाजकंटक दत्ता सोपान पवार याच्यावर देखील राजद्रोहाचा गुन्हा दाखल करू असं ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
यावेळी लॉन्ग मार्च आंदोलनाचे आयोजक आशिष वाकोडे यांनी आंदोलनकर्ते विशेष करून आंदोलनातील महिलांना होणारा त्रास आजरपण यांचा विचार करून लॉन्ग मार्च थांबवण्याचा निर्णय घेतला या लॉन्ग मार्चचे चैत्यभूमी येथे समारोप करून सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी लॉन्ग मार्चचे स्वागत केल आणि शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना आशिष वाकोडे म्हणाले की आदरणीय सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी आमच्या लढ्याला वेळोवेळी बळ देण्याचं काम केल यावेळी त्यांनी सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्यासह तमाम आंबेडकरी समाजाचे देखील आभार मानले यावेळी त्यांनी डिजी सुनिल रामानंद साहेब (कायदा आणि सुव्यवस्था) व डिसीपी विजयकांत सागर यांचे विशेष आभार मानले......
0 टिप्पण्या