🌟परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील देगाव येथील तरुणाचा अपघाती मृत्यू नसून खूनच....!


🌟अशी माहिती पुर्णा पोलिस तपासातून आली उघडकीस🌟 

परभणी (दि.२२ मार्च २०२४) : परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातील देगाव येथील २४ वर्षीय तरुण विनोद दत्तराव थोरात या युवकाचा अपघाती मृत्यू नव्हे तर त्याचा खूनच झाल्याची माहिती पुर्णा पोलिसांच्या तपासातून उघडकीस आली आहे.

        मयत विनोद थोरात यांचा भाऊ विशाल दत्तराव थोरात यांनी पुर्णा पोलिस स्थानकात दि.१४ मार्च २०२५ रोजी आपला भाऊ विनोद हा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली त्याचवेळी फिर्यादीत त्याला त्याचा मित्र विशाल वावळे हा सोबत घेवून गेला होता असे नमूद केले पुर्णा पोलिसांनी पोलिस निरीक्षक विलास गोबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने हालचाली केल्या तेव्हा पोलिसांना विशाल थोरात यांच्या भावाचे लोकेशन अर्धापूर पोलिस स्थानकाच्या अंतर्गत आढळून आले तात्काळ धावपळ केल्यानंतर त्या ठिकाणी विनोद थोरात हा मयत अवस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्यावर, कपाळावर व शरिरावर ठिकठिकाणी जखमा आढळल्या. जीवे मारुन त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करत मृतदेह आणि दुचाकी अर्धापूर पोलिस स्थानकाच्या हद्दीत या घटनास्थळी आणून टाकण्यात आली या प्रकरणात नांदेड पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करीत पुढील तपासाकरीता पूर्णा पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग केले.

            दरम्यान,या प्रकरणात विशाल उर्फ बाळू अशोक वावळे याच्या विरोधात खून केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या