🌟भारतीय महिलेने अमेरिकेत स्वतःच्या मुलाची गळा चिरून केली निर्घृण हत्या....!


🌟सदर महिला घटस्फोटित असून ती तिच्या पती आणि मुलापासून वेगळी राहत होती🌟

वॉशिंग्टन : अमेरिकेत एका भारतीय वंशाच्या महिलेने तिच्या ११ वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या केली. महिलेचे नाव सरिता रामाराजू (४८) असून तिच्या मुलाचे नाव यतिन रामाराजू आहे. सदर महिला घटस्फोटित असून ती तिच्या पती आणि मुलापासून वेगळी राहत होती. जानेवारी २०१८ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

 यानंतर, ती महिला कॅलिफोर्निया सोडून व्हर्जिनियामध्ये राहू लागली. घटस्फोटानंतर मुलाचा ताबा वडील प्रकाश राजू यांच्याकडे देण्यात आला, तर सरिताला तिच्या मुलाला भेटण्याचा अधिकार देण्यात आला होता. मुलाच्या ताब्यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. यातूनच तिने मुलाची हत्या केल्याचे सांगण्यात येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या