🌟पुर्णा तालुक्यातील गौर ग्रामपंचायत निष्क्रिय कारभारात संपूर्ण तालुक्यात म्हणे फारच चांगली ?


🌟...अन् ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांनी विविध नागरी सुविधांसह पाण्याच्या प्रश्नावर मात्र गावाची इज्जत अक्षरशः वेशीवर टांगली🌟



पुर्णा (वृत्त विशेष) :- पुर्णा तालुक्यातील गौर ग्रामपंचायत निष्क्रिय कारभारात संपूर्ण तालुक्यात म्हणे फारच चांगली ? अन् ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांनी विविध नागरी मुलभूत सुविधांसह पाण्याच्या गंभीर प्रश्नावर मात्र गावाची इज्जत अक्षरशः वेशीवर टांगली....एकंदर अशा पध्दतीचा कारभार गौर ग्रामपंचायत प्रशासनाने गौर गावात चालवला असल्याचे पाहावयास मिळत असून गावातील मुलभूत नागरी सुविधा अर्थात चांगले रस्ते सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नाल्या तसेच गावातील स्वच्छता व सुव्यवस्थेसह पिण्याच्या स्वच्छ व निर्जंतुक पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यात गौर ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी अंजना लाडेकर संपूर्णतः अपयशी ठरल्याचे पाहावयास मिळत असून शासनाने पाणीपुरवठा योजनेसाठी विविध शासकीय योजनांसह जल जिवन मिशन योजनांतर्गत कोट्यवधी रुपयांचा शासकीय निधी उपलब्ध करून दिल्यानंतर देखील गौर गावात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

 गौर गावात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मार्च महिन्यात गावातील अनेक बोर संपूर्णतः आटले असून गावातील तळ देखील अक्षरशः कोरड पडल असून अर्धवट अवस्थेतील जलजिवण मिशन योजनेतील नळ तुरळक काही भागांत थेंब थेंब अश्रू ढाळल्यागत मनुष्य प्राण्यांऐवजी किड्या मुंग्यांना पाणीपुरवठा करीत असल्याने मनुष्य प्राण्यांवर मात्र पाणी पाणी म्हणून स्वतःचा घसा कोरडा पडोस्तर ओरडण्याची वेळ आली असतांना ग्रामविकास अधिकारी लाडेकर मात्र चार/सहा दिवसाला ग्रामपंचायत कार्यालयात बसून बिसलेरी पाण्याने आपली तहान भागवत 'शासकीय निधी मिळवा अन् बोगस विकासकामांना प्रोत्साहन देऊन तो शासकीय निधी सोईस्कर रित्या जिरवा' असा कारभार हाकतांना पाहावयास मिळत आहे जवळपास पाच ते साडेपाच हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या गौर गावातील माता-भगिनींसह अबालवृद्ध पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दरबदर भटकंती करीत असल्याची अत्यंत केविलवाणी परिस्थिती पाहावयास मिळत आहे.

गौर ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांच्यासह गौर ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच गावातील पाण्याचा गंभीर प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने कोणते ठोस पाऊल उचलतात याकडे गावातील संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या