🌟या घटनेच्या अवघ्या दोन तासांत पोलिसांनी आरोपीला अटक केली🌟
व्हर्जिनिया : अमेरिकेत भारतीयांवर सुड उगवण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास येत असून अमेरिकेतील भारतीय नागरिकांवर हल्ल्यांची मालिका थांबणार तरी केव्हा? असा प्रश्न उपस्थित करणारी घटना व्हर्जिनियामध्ये घडली असून दारूच्या दुकानात काम करणाऱ्या एका गुजराती वडील आणि मुलीची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली.गुरुवार दि.२० मार्च २०२५ रोजी सकाळी प्रदीप पटेल (५६) व त्यांची मुलगी उर्वी पटेल (२४) यांनी दारूचे दुकान उघडताच एका काळ्या माणसाने दोघांवर गोळीबार केला आणि तो पळून गेला गोळीबारात प्रदीप यांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेच्या अवघ्या दोन तासांत पोलिसांनी आरोपीला अटक केली. घटनेच्या दिवशी आरोपी संपूर्ण रात्र दारूच्या दुकानाबाहेर बसला होता. सकाळी दुकान उघडताच तो आत शिरला आणि त्याने दोघांवर गोळीबार केला. रात्री दुकान उघडले जात नसल्याबद्दल आरोपीला राग आला होता, असे तपासात उघड झाले आहे...
0 टिप्पण्या