🌟जीवनात परमात्मा प्राप्ती साठी समर्पित भावाने जीवन जगावे - जगद्गुरु शंकराचार्य स्वामी द्वारका पीठ


🌟 नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातल्या हळदा येथे आयोजित कार्यक्रमात संबोधित करतांना ते म्हणाले🌟

नांदेड/नायगाव :- संसार मध्ये भक्ती भाव जागृत ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपले जीवन भगवान परमात्माच्या प्रति समर्पित भावाने जगुन आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे,भगवान परमात्मा सर्वत्र असताना आपण भगवान पूजना साठी इतरत्र जाऊन जो समर्पित भाव व्यक्त करतो तोच भाव आपल्या शरीरावर व्यक्त करून आपले अनमोल जीवन सार्थक करावे असे प्रतिपादनजगद्‌गुरु शंकराचार्य द्वारकापीठ यांनी स्वामीत्वाचे पंचपीठम् सिध्दतिर्थधाम हाळदा येथे आयोजित आशिर्वाचनं  कार्यक्रमात उपस्थितीत भक्त गण याना मार्गदर्शन करताना व्यक्त केले

      जगद्‌गुरु शंकराचार्य द्वारकापीठ स्वामीत्वाचे पंचपीठम् यांचे सिध्दतिर्थधाम (हाळदा) येथे यांचे परमपावन आगमन गेल्या शनिवार पासून झाले आहे. त्यांच्या दर्शन, दीक्षा व आशिर्वचनाचा एक दोन मार्च रोजी भव्य कार्यक्रम घेण्यात आला असुन तीन मार्च रोजी काल्याचे कीर्तन, दही हंडी जगद्गुरु यांचे आशिर्वचंन सोहळा व महाप्रसाद कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता होणार असून समस्त सनातनी हिंदू बांधवांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन हळदा मठाचे महंत श्री  विशुद्धानंद महाराज यांनी केले आहे. 

    हळदा तालुका कंधार येथे दरवर्षी प्रमाणे साजऱ्या होणाऱ्या मुख्य वार्षिक यात्रे निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवासाठीअनंत श्री विभूषित सामवेदीय पश्चिमाम्नाय द्वारका शारदा पिठाधिश्वर श्रीमज्ज जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती जी महाराज श्री शारदामठ, द्वारका, गुजरात, भारतयांच्या प्रथम आगमन सोहळा साजरा करण्यात आला आहे.या निमित्त हाळदा नगरीत भव्य कार्यक्रम चालू आहेत.

    या निमित्त दिनांक एक मार्च दोन मार्च रोजी स्वागत सोहळा, दर्शन व आशिर्वचन कार्यक्रम घेण्यात आला.या वेळी लोहा कंधार मतदार संघाचे आ .प्रताप पाटील चिखलीकर,शिवराज पाटील होटाळकर,प्रवीण पाटील चिखलीकर,संदीप पाटील चिखलीकर, बालाजीराव पांडागळे,मनीष वडजे,बाळासाहेब पांडे,एकनाथ महाराज पाळेकर ,प्रबोधन महाराज पाळेकर,सरदेशपांडे नांदेडकर आदींची उपस्थिती होती.

********************************

💫आज ०३ मार्च रोजी दीक्षा व आशिर्वाचनं सोहळा :-

 दि. ०३मार्च २०२५ रोज सोमवार सकाळी ७ ते १० दिक्षा,कार्यक्रम या नंतर  काल्याचे कीर्तन व दर्शन सोहळा आशिर्वचन  कार्यक्रम होणार आहे.तरी नांदेड जिल्हा पंचक्रोशीतील भक्त गणांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावून दर्शन व आशीर्वचंन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे स्वामी विशुद्धा नंद महाराज सिद्धतीर्थ धाम हळदा यांनी केले आहे......

✍️बाळासाहेब पांडे (नायगाव)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या