🌟राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट🌟
मुंबई :- औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होणार नाही मात्र संरक्षण करावे लागेल कारण या अगोदरच केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे राज्य सरकारला संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोमवार दि.१७ मार्च रोजी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार आज जयंती आहे. या निमित्ताने भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं. यावेळी राज्यभरात गाजत असलेल्या औरंगजेबच्या कबरीसंदर्भात भाष्य केलं. ते म्हणाले की, पन्नास वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने औरंगजेबाची कबर ऐतिहासिक वास्तु म्हणून घोषित केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे या परिसराला संरक्षण आहे. राज्य सरकारने या कबरीला संरक्षण दिले असले तरी औरंगजेबाचे उदात्तीकरण येथे खपवून घेतले जाणार नाही. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज लोकार्पण होत असलेल्या नव्या शिव मंदिराचे कौतुक केलं. महाराजांचे दर्शन कशासाठी तर आज आपण आपल्या इष्ट देवाची पूजा करतो ते केवळ शिवाजी महाराजांमुळे ! इथे केवळ मंदिर नाही तर तटबंदी आहे. शिवाजी महाराजांचे सर्व प्रसंग इथे आहेत.......
0 टिप्पण्या