🌟नांदेड येथील बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शहिद दिनानिमित्त शहिद क्रांतिकारकांना अभिवादन.....!


🌟शहरातील शहिद भगतसिंघ रोडवरील संपर्क कार्यालयात दि.२३ मार्च रोजी शहिद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना अभिवादन🌟 


नांदेड :
- नांदेड येथील बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दि.२३ मार्च २०२५ रोजी शहरातील भगतसिंग रोड परिसरातील संपर्क कार्यालयात शहीद दिनाचे औचित्य साधून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तीन महान शुरवीर क्रांतिकारी शहिद सरदार भगतसिंघ राजगुरू सुखदेव या थोर सुपुत्रांना अभिवादन करण्यात आले भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सशस्त्र लढा उभारुन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शहीद-ए-आझम सरदार भगतसिंग राजगुरू व सुखदेव या तीन महान क्रांतिकारी शुरवीरांना तत्कालीन ब्रिटिश सरकारने २३ मार्च रोजी फाशी दिली होती शहिद सरदार भगतसिंघ राजगुरू सुखदेव हे तीघेही शुरवीर भारतीय तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.  


शहिद भगतसिंघ राजगुरू सुखदेव यांनी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी हसतमुखाने आपले जीवन अर्पण केले तेव्हापासून दरवर्षी २३ मार्च रोजी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहीद दिन साजरा केला जातो शहिद भगतसिंग यांनी वयाच्या ८ व्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्याबद्दल विचार करायला सुरुवात केली आणि वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी घर सोडले. तिघांनाही २३ मार्च १९३१ रोजी ब्रिटिश सरकारने फाशी दिली २३ मार्च हा दिवस भारतीय इतिहासात कायमचा अमर राहील कारण या दिवशी या शहीदांनी आपले बलिदान देऊन भारताला स्वातंत्र्याच्या मार्गावर एक पाऊल पुढे नेले.      


 बाबा फतेहसिंघजी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव स.मनबीरसिंघ ग्रंथी शहिद दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात बोलतांना म्हणाले की शहिद स.भगतसिंग,राजगुरू व सुखदेव हे केवळ त्यांच्या काळातील महान क्रांतिकारक नव्हते तर आजही ते भारतातील तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत या तिघांचे धाडस आणि देशभक्ती आपण कधीही विसरू शकत नाही कारण त्यांचे हृदय भारतासाठी धडधडते भारतमातेच्या स्वातंत्र्या बरोबरच शहिद भगतसिंघ राजगुरू सुखदेव यांनी १९२९ मध्ये तुरुंगात भारतीय कैद्यांना दिलेल्या अपमान आणि अमानुष वागणुकी विरोधात देखील आवाज उठवला लहानपणापासूनच राजगुरूंना स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्याची इच्छा होती वाराणसीमध्ये शिक्षण घेत असताना राजगुरू अनेक क्रांतिकारकांच्या संपर्कात आले.  चंद्रशेखर आझाद यांच्यामुळे इतके प्रभावित झाले की ते लगेचच त्यांच्या हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी पक्षात सामील झाले त्यावेळी ते फक्त १६ वर्षांचे होते. 

आज आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे की या शहीदांनी आपल्याला दिलेले स्वातंत्र्य खूप मौल्यवान आहे असेही यावेळी बोलताना मनबीरसिंघ ग्रंथी यांनी म्हणाले दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शहिद भगतसिंघ रोड परिसरातील बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संपर्क कार्यालयात सिख समाजाचे ज्येष्ठ नागरिक व निवृत्त पोलीस अधिकारी स.टहेलसिंघजी निर्मले व स.महेलसिंघजी लांगरी यांच्या हस्ते शहिदांना पुष्पहार अर्पण करून थंड शरबतचे वाटप करण्यात आले त्यावेळी करीमनगर गुरुद्वाराचे माजी अध्यक्ष स.मंजीतसिंघ कॉन्ट्रॅक्टर, स.बीरेंद्रसिंघ बेदी, सचखंड  गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य स.जर्नलसिंघ गाडीवाले, स.तिरथसिंघ कडेवाले, स.जसपालसिंघ लाखवाले, स.जगदीपसिंघ नंबरदार, स.जसबीरसिंघ बुंगई, स.अजितसिंघ बेदी,स.नवदीपसिंघ कामठेकर, स.गजेंद्रसिंघ शाहू, शंकर यादव, स.गुरमीतसिंघ बुंगई, स.जसबीरसिंघ हुंदल, स.पुनीतसिंघ कामठेकर, स.जगमीतसिंघ संधू, स.रघुसिंघ बावरी आदी उपस्थित होते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव स.मनबीरसिंघ ग्रंथी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या