🌟चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आयशर ट्रक थेट कोसळला गोदावरी नदीच्या पात्रात....!


🌟परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर खळी-दुसलगाव परिसरातील घटना🌟 

परभणी (दि.०६ मार्च २०२५) :- परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर खळी-दुसलगाव परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आयशर ट्रक थेट गोदावरी नदीच्या पात्रात कोसळल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवार दि.०६ मार्च २०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजेच्या सुमारास घडली या अपघातात चालक आणि अन्य एक असे दोघे जन जखमी झाले आहेत.

           या संदर्भात सविस्तर वृत्त असे की धुळे येथून लातूर जिल्ह्यातील उदगीरकडे साड्यांची वाहतूक करणारा आयशर ट्रक आज गुरूवारी सकाळी ०९.०० वाजण्याच्या सुमारास परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर खळी-दुसलगाव परिसरात आला असता अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे हा आयशर ट्रक थेट गोदावरी नदीच्या पात्रात कोसळला. त्यामध्ये चालक आणि अन्य एक असे दोघे जखमी झाले. घटनेची माहिती कळताच खळी येथील युवा कार्यकर्ते उत्तम पवार, रुग्णवाहिका चालक रावण भालेराव, दत्ता सोळंके यांनी गोदावरी नदीमध्ये उतरून ट्रकमधील दोघांना बाहेर काढले. जखमी झालेल्या दोघांनाही तात्काळ गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या