🌟अशी माहिती डॉ.अतुल भाले यांनी दिली आहे🌟
प्रतिनिधी
पाथरी:-शहरातील सुमनांजली हॉस्पिटल येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉ भाले यांचे सुमनांजली हॉस्पिटल,शिवनेरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल परभणी आणि मानवत मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटल यांच्या सौजन्याने शनिवार ८ मार्च रोजी मधुमेह, डायबेटीज,ब्लेड प्रेशर (बिड.पी) व हृदयरोग रुग्णांकरीता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ अतुल भाले यांनी दिली.
या आरोग्य शिनबिरात मधुमेह असणाऱ्या रुग्णांना भविष्यामध्ये हृदय व किडनीचे आजार जडण्याची जास्त शक्यता असते. उदा. रक्तातील चरबीचे प्रमाण वाढुन हृदयाचा झटका येणे, किडनीद्वारे प्रथीने जाऊन किडनी खराब होणे, तसेच हातापायांच्या नसा कमजोर होऊन बोथटपणा किंवा मुंग्या येणे, अशा प्रकारचे वेगवेगळे आजार जडतात तरी त्या आजाराची काळजी आजार होण्यापुर्वीच घेतली तर भविष्यातील संभाव्य धोके टळतात. त्याकरिता निरनिराळ्या तपासण्या तसेच इ.सी.जी. करणे आवश्यक असते व वेळोवेळी या तपासण्या करण्यास भरपुर खर्च होतो. त्याकरिता डॉ. भाले यांचे सुमनांजली हॉस्पिटल तर्फे सर्व तपासणी शिबीर रविवार दिनांक ०८ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉ भाले यांनी दिली.
यावेळी जेवना पुर्वी रक्त तपासणी,जेवना नंतर रक्त तपासणी,रक्तातील चरबीचे प्रमाण,इसीजी,रक्तदाब तपासणी व आरेग्यावर चर्चा आणि उपचार,सहभागी व्यक्तींशी रिपोर्ट बद्दल सविस्तर चर्चा. होणार असल्याचे डॉ भाले म्हणाले.या शिबिरात सहभागी होण्या साठी नोंदनी आवश्यक असून नाम मात्र शुल्क दोनशे रुपये आकारण्यात येणार आहे. या वेळी मधुमेह रुग्णांसाठी जेवनाची व्यवस्था करण्यात आल्याचे ही ते म्हणाले.शहरातील उपविभागिय कार्यालया बाजूला असलेल्या सुमनांजली हॉस्पिटल येथील या आरोग्य शिबिराचा लाभ गरजूंनी घेण्याचे आवाहन डॉ अतुल भाले यांनी केले आहे.......
0 टिप्पण्या