🌟नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ताही शेतकऱ्यांना मिळणार....!



🌟सहाव्या हप्त्यासाठी १ हजार ६४२ कोटी रुपयांच्या वितरणासाठी मान्यता🌟

🌟शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच निधी वितरित करण्यात येणार🌟

मुंबई :-  राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी १ हजार ६४२ कोटी रुपयांच्या वितरणासाठी मान्यता दिली आहे. नमोच्या हप्त्याची प्रतिक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच निधी वितरित करण्यात येणार आहे.

याबद्दलचा शासननिर्णय राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने बुधवार दि.२६ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध केला आहे. राज्य सरकारने २०२३ च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो महासन्मान निधी योजना राबवण्याची घोषणा केली. या योजनेतून तीन समान टप्प्यात वार्षिक ६ हजार रुपयांची मदत देतं. म्हणजेच चार महिन्याला २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जातात. आत्तापर्यंत या योजनेतून पाच हप्त्याचं वितरण करण्यात आलं आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या