🌟पुर्णेत संत रोहिदास महाराज व कंकय्या महाराज जयंती सोहळ्यात बोलताना चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड म्हणाले🌟
पूर्णा(दि.०१ मार्च २०२५) - आपली थोर संत परंपरा, शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्याप्रेरणेतून बनलेल्या संविधानामुळेच हे अधिकार आपल्याला मिळाले आहेत. संविधान नसतं, तर हे सर्व मिळालं नसतं. संविधानामुळेच आपला विकास झाला आहे. आणि म्हणून संत रविदास महराजांच्या शिकवणीचा आणि त्यावर आधारित संविधानाचा जागर करत राहणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.असे प्रतिपादन चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी केले.
पूर्णा शहरातील सकल चर्मकार बांधवांनी ज्ञानेश्वरी विद्या मंदिर शाळेच्या भव्य प्रांगणात शुक्रवारी दि.२८ फेब्रुवारी रोजी श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज व श्री कक्कया महाराज यांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मुख्य मार्गदर्शिक म्हणून गायकवाड हे बोलत होते.
प्रारंभी संत रोहिदास महाराज, ककय्या महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष सूर्यवंशी तर मंचावर
स्वागताध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून रा.च.म. प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड,उदघाटक संबा वाघमारे (विदर्भाध्यक्ष), मनिषा गायकवाड हिंगोली ,सहादू ठोंबरे,मुरलीधर ठोंबरे, प्रा.विष्णू असोरे,विनोद असोरे, मुरलीधर ठोंबरे,रामकिशन कांबळे, प्रकाश फुलवरे, हर्षवर्धन गायकवाड दादाराव पंडित, तुषार गायकवाड, बंटी रणवीर डॉ.चंद्रभान गंगासागरे डॉ. नागनाथ झुंजारे डॉ.भाग्यवंत,रामकिशन कांबळे, नरहरी सोनवणे,चांदोजी कांबळे आदीं मान्यवरांसह समाज बांधव विशेषत; महीला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.मान्यवरांच्या हस्ते गटई कामगारांना किटचे वाटप करण्यात आले.यावेळी उपस्थित बांधवांसाठी महाभोजनाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक अमोल गायकवाड तर सूत्रसंचालन पवन असोरे आभार सुशील गायकवाड सुशिलकुमार दळवी यांनी तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी , जयंती अध्यक्ष सुशिल गायकवाड, कार्याध्यक्ष सुशिलकुमार दळवी,बबन अन्नपूर्णे, पुरभाजी असोरे, हरी असोरे, शंकरराव जोगदंड,अनिल नारायणकर, दीपक जोनवाल, लक्ष्मण परसुते, मुंजाजी असोरे, विकास गायकवाड,गजानन सूर्यवंशी, रवि हराळे ज्ञानेश्वर असोरे हरी जोगदंड,रोहिदास जोगदंड, धनराज आसोरे आदींनी परिश्रम घेतले. त्यावेळी जयंती अध्यक्ष सुशिल गायकवाड कार्याध्यक्ष सुशीलकुमार दळवीयांनी सर्वांचे आभार मानले.....
0 टिप्पण्या