🌟विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा खळबळजनक आरोप🌟
मुंबई : राज्यातील भाजप-शिवसेना (शिंदे) गट व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त महायुती सरकारने मोठ्या घोषणा केल्या असल्यातरी या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडे पैसाच नाही त्यातच गंभीर बाब म्हणजे राज्यावर ८ लाख कोटींचे कर्ज असताना राज्याच्या तिजोरीत डल्ला मारण्याचे काम महायुती सरकार करत आहे असा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल शुक्रवार दि.०७ मार्च २०२५ रोजी केला.
पुरवणी मागण्यांवर केलेल्या भाषणात ते बोलत होते. दानवे म्हणाले की, सरकार मोठ्या घोषणा करते. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करत नाही. राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी स्थिर करायची असल्यास लोकप्रिय योजनांच्या मागे सरकारने जाऊ नये, अशी सूचनाही दानवे यांनी केली. सरकारने निधी वाटपात केलेली असमानता, रखडलेले प्रकल्प याबाबत मुद्दे मांडत दानवे यांनी सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांवर टीकेची झोड उठवली. सरकारने ६ हजार ४८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. त्यातील २ हजार १३३ कोटी रुपये केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाअंतर्गत असलेल्या योजनांसाठी केला असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.
दानवे यांनी सांगितले की, पंतप्रधानांचे स्वप्न असलेले स्कील इंडिया म्हणजेच कौशल्य विभागाच्या योजना या आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. जलसंपदा विभागामध्ये २७ हजार कोटी रुपये असताना त्यातून १४ हजार कोटी रुपयेसुद्धा खर्च झाले नाहीत. जिल्हा परिषद आणि जीवन प्राधिकरण अंतर्गत ९४५ योजना प्रस्तावित असताना त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असताना २९ हजार कोटी रुपयांची मागणी असूनही कमी निधीची तरतूद करण्यात आली, असे ते म्हणाले.....
0 टिप्पण्या