🌟पाणी फाउंडेशनच्या वतीने प्रा.डॉ.मीनाक्षीताई पाटील भुसारे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान.....!


🌟पुण्यात पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित भव्य सन्मान सोहळ्यात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला🌟

पुणे :- पुणे येथील बालेवाडी येथे पार पडलेल्या पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य सोहळ्यात प्रा.डॉ.मीनाक्षीताई पाटील भुसारे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल सुप्रसिद्ध सिने अभिनेते आमिर खान व निर्माती किरण राव तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ना. माणिकराव कोकाटे यांच्या हस्तें पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी कृषी विद्यापीठ मधील अनेक शास्त्रज्ञाला देखील पाणी फाउंडेशन तर्फे गौरविण्यात आले.

पाणी फाउंडेशन तर्फे गौरविण्यात आलेल्या कृषी विद्यापीठातील सर्व शास्त्रज्ञाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल परभणी जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक ग्रुपच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे जलसंवर्धन व पर्यावरण रक्षणासाठी तुमच्या केलेल्या अथक परिश्रमांना मिळालेली ही दाद निश्चितच प्रेरणादायी आहे. तुमचे कार्य भविष्यातही असाच सकारात्मक प्रभाव पाडत राहो अशी सदिच्छा देखील भाजीपाला उत्पादक ग्रुपच्या सर्व शेतकरी बांधवांनी त्यांना दिल्या आहेत..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या