🌟स्मशानभूमीतील प्लास्टिक कॅरी बॅग काटेरी झुडपांसह वाळून पडलेल्या झाडांची पाने फांद्या जाळून केली प्रदुषण मुक्त होळी🌟
पुर्णा :- पुर्णा शहरातील लिंगायत समाज बांधवांनी आज गुरुवार दि.१३ मार्च रोजी पुर्णा नदीकाठावरील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत एकत्रित येऊन त्या स्मशानभूमीमध्ये स्वच्छता मोहीम राबवत श्रमदान करून स्मशानभूमीतील केरकचरा प्लास्टिक कॅरीबॅग,रिकाम्या पाण्याच्या रिकाम्या बिसलेरी बॉटल,पाणी पाऊच वेस्टेज सामग्री इत्यादी सामग्रीसह बाभुळ बोरी आदी काटेरी झुडपांसह वाळून गळून पडलेली झाडांची पाने फांद्या आदींचे संचलन करून त्यांची होळी करून अनोख्या पद्धतीने होळी सन साजरा केला.
यावेळी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी सामाजिक कार्यकर्ते यांनी श्रमदानात सक्रिय सहभाग नोंदवून लिंगायत स्मशानभूमीतील फुल झाडांना पाणी दिले आणि काटेरी झुडपांची अस्ताव्यवस्थ पडलेले झाडांचे फाटे त्यांची साफसफाई करून स्मशानभूमीतील रस्ते मोकळी केली सिमेंट रोडवर पडलेली काटे कॅरीबॅग सर्व उचलून एका अलिप्त ठिकाणी टाकून ते पेटून जाळून त्याची होळी केली आणि होळीच्या दिवशी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी सज्ज राहून ठीक ठिकाणी पर्यावरणाचा विचार करून कॅरीबॅग पॉलिथिन प्लास्टिक नष्ट करून त्यांची होळी करण्याची गरज आहे आसा संदेश देखील लिंगायत समाज बांधवांनी यावेळी दिला तसेच स्मशानभूमी ही फक्त अंत्यविधीसाठी उपयोगात वापरूनच केवळ त्याचा उपयोग न घेता त्या ठिकाणी सुद्धा स्वच्छता असावी फुलझाडे असावी नैसर्गिक वातावरण असावे प्रदूषण मुक्त स्मशानभूमी असावी या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली आणि होळीचे औचित्य साधून वेस्टेज केरकचरा प्लास्टिकची होळी करून एक आगळावेगळा आदर्श पुर्णेतील लिंगायत समाज बांधवांनी दाखवून दिला.
यावेळी श्रमदानासह होलीका दहनाचा हा उपक्रम सकाळी ०६.०० ते ०९.०० असा तब्बल तीन तास चालला यावेळी लिंगायत समाजातील तरुण तडफदार स्वयंसेवक वैभव फुलारी यांचा वाढदिवस देखील लिंगायत स्मशानभूमी येथे साजरा करण्यात आला वाढदिवसाचे औचित्य साधून वैभव फुलारी यांनी लिंगायत स्मशानभूमीत लावलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी रबरी पाईपचे बंडल भेट दिले यावेळी उपस्थित लिंगायत समाज बांधवांनी विधिवत होळी पूजन करून होळी पेटवली व होळीला प्रदक्षिणा घालून हर हर महादेवाच्या गजरात घोषणा देत होळी साजरी केली.
यावेळी वैभव फुलारी,किशोर गाढवे,मंगेश कापूसकरी,नामदेव घाळे, अमोल मिटकरी,शिवानंद स्वामी,शिवशंकर स्वामी, सर्वेश एकलारे, रोहित एकलारे, गजानन महाजन, विद्यानंद कापुसकरी, राजू अण्णा एकलारे, शंकर गलांडे, सोमनाथ पाथरकर, विनायक देसाई, रमेश अण्णा एकलारे,नागेश नागठाणे आदी मान्यवरांनी परिश्रम घेऊन होळी केली साजरी.....
0 टिप्पण्या