🌟परभणीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त आयोजित नाट्यप्रयोगास उस्फूर्त प्रतिसाद...!


🌟या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या हस्तें करण्यात आले🌟


परभणी
:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने "राजयोगिनी अहिल्यादेवी" या भव्य नाट्य प्रयोगाचे प्रभावती नारी मंच व पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र यांच्यावतीने परभणी येथील अक्षदा मंगलकार्यालय येथे सोमवार दिनांक २४ मार्च रोजी सायंकाळी ०६ च्या सुमारास आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी परभणी जिल्हा सरकारी अभियोक्ता अँड. ज्ञानोबा दराडे, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष ऋषिकेश सकनुर , प्रभावती नारी मंचाच्या सुनिता कुलकर्णी ,सुरेखा दराडे, जयश्री कालानी, यांची व्यासपीठावरती उपस्थिती होती नाट्यप्रयोगापूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणूताई मोगरकर यांनी केले तर आभार ऋषिकेश सकनुर यांनी मानले देशभरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे त्रिशताब्दी वर्ष मोठ्या उल्हासात आणि उत्साहाने साजरे होत आहे त्याचाच एक भाग म्हणुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांकडून कळविण्यात आले.


यावेळी नाट्यप्रयोगामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनावर आधारित खालील विविध पैलूंना स्पर्श करण्यात आला अहिल्यादेवी होळकर यांचे आयुष्य भारतीय इतिहासातील एक सुवर्ण पर्व आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या साधारण कुटुंबातील मुलीपासून ते असाधारण शासनकर्त्या पर्यंतचा त्यांचा जीवन प्रवास आजही प्रेरणादायी आहे. त्या प्रशासकीय कार्यक्षमता, दूरदृष्टी आणि उज्ज्वल चारित्र्य या साठी अतुलनीय आदर्श होत्या त्यांची सत्ता सामाजिक सुधारणा, कृषी सुधारणा, जल व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण, जन कल्याण आणि शिक्षणासाठी समर्पित होती तसेच त्यांची राजवट न्यायप्रिय होती. समाजातील सर्व घटकांना समरसतेच्या दृष्टीकोणातून सुरक्षा तसेच प्रगती साठी संधी देणे हा त्यांच्या प्रशासनाचा मुख्य आधार होता. 

त्यांच्या याच जीवनकार्यांचा प्रचार आणि प्रसार "राजयोगिनी अहिल्यादेवी" भव्य नाट्याच्या माध्यमातून कलाकारांनी दाखवण्याचा सुंदर प्रयत्न केला सदरील नाटकाचे सादर करते. अनुनाद कलाविष्कार बहुउद्देशीय संस्था छत्रपती संभाजी नगर येथील असून ,लेखक: प्रा. प्रीती पोहेकर दिग्दर्शक: राजेश्री पोहेकर- कुलकर्णी सह-दिग्दर्शक: सिद्धेश्वर थोरात यांनी केले होत अशाप्रकारच्या प्रयोगाचे आयोजन परभणी जिल्ह्यात सर्वप्रथमच झाले असल्याचे प्रत्यक्ष श्रोत्यांकडून कडून बोलण्यात आले हे नाटक पाहण्यासासाठी आयोजकांनी विनामुल्य प्रवेश ठेवला होता.

 प्रभावती नारी मंच व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या अहवानास प्रतिसाद देत.परभणी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील धार्मिक, सामाजिक ,राजकीय ,सांस्कृतिक ,प्रशासकीय ,विविध क्षेत्रातून नागरिकांना तसेच लक्षणीय संख्येमध्ये महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित लावल्याचे दिसून आले प्रभावती नारी मंच व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र यांच्या या आवाहनास प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या नाट्यप्रयोगाची शेकडो प्रेक्षकांनी आपली उपस्थिती दर्शवत या नाट्यप्रयोगाची शोभा वाढवली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या