🌟महाराष्ट्र देशात कॅन्सर रुग्णांमध्ये दुसऱ्या क्रमाकांवर🌟
दिल्ली (वृत्तसेवा) - भारतातील महिला आणि पुरुषांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मागील १० वर्षात कॅन्सर रुग्णांची संख्या साडेपाच लाखांनी वाढली असून सध्या भारतात कॅन्सरचे १५ लाख ७० हजार रुग्ण असल्याची माहिती पुढे आली आहे. एवढेच नव्हे तर २०४० पर्यंत कॅन्सर रुग्णांची संख्या २२ लाखांचा आकडा ओलांडणार असल्याचा अंदाज जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थेने वर्तविला आहे.
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत दिलेल्या उत्तरानुसार, भारतात कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा आणि महिलांमध्ये स्तन कॅन्सरचे प्रमाण वाढण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. याशिवाय पुरुषांमध्ये मुख आणि प्रोस्टेटचे तर महिलांमध्ये गर्भाशय आणि डिंबग्रंथी (ओवरी) चा कर्करोग वाढण्याचे प्रमाण जास्त आहे.......
0 टिप्पण्या