🌟निवडणूक पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने आता मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याच्या प्रक्रियेला गती ?


🌟मतदान ओळखपत्रही आधारला जोडणार : भारतीय निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग🌟 

नवी दिल्ली : देशभरात आधारकार्ड सोबत पॅनकार्ड लिंक करण्यात आल्यानंतर आता भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार ओळखपत्र देखील आधार कार्डला जोडण्याच्या योजनेवर गांभीर्याने काम करत आहे निवडणूक पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने आता मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याच्या प्रक्रियेला गती दिली जाऊ शकते. 

यासंदर्भात पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यात गृह मंत्रालय, कायदा मंत्रालय आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच यूआयडीएआय' (आधार जारी करणारी संस्था) यांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. संसदेत सध्या ड्युप्लिकेट मतदार ओळखपत्रांच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून जोरदार आवाज उठवला जात आहे. बनावट आणि ड्युप्लिकेट मतदारांची ओळख पटवून मतदार यादी शुद्ध करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. बनावट मतदारांच्या मुद्द्यावर विविध राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर पुढील तीन महिन्यांत बनावट मतदारांची ओळख पटवून त्यांना यादीतून कायमचे काढून टाकण्यात येईल, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात दिले होते.

लोकप्रतिनिधी कायदा-१९५१ मध्ये चार वर्षांपूर्वी सुधारणा करण्यात आल्यानंतर, निवडणूक आयोगाने मतदारांकडून स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यास सुरुवात केली. निवडणूक आयोगाने अद्याप आधार आणि मतदार ओळखपत्र डेटाबेस लिंक केलेले नाहीत. ड्युप्लिकेट मतदार नोंदणी ओळखून मतदार यादीतील बनावट नावे काढण्यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, पण ती आधारशी जोडणे अनिवार्य करण्यात आले नव्हते.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या