🌟पुर्णा तालुक्यातील गौर येथील दैनिक लोकमतचे पत्रकार नवनाथ पारवे यांना पितृशोक......!


🌟रामराव कुशेजी पारवे यांचे १०२ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन🌟

पुर्णा (दि.१५ मार्च २०२५) :- पुर्णा तालुक्यातील गौर येथील जेष्ठ नागरिक तथा श्री सोमेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक रामराव कुशेजी पारवे यांचे काल शुक्रवार दि.१४ मार्च २०२५ रोजी रात्री १०.२० वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.

मृत्यूसमयी त्यांचे वय १०२ वर्ष होते ते गौर येथील जागृत देवस्थान श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदावर ४० वर्षांपासून कार्यरत आहेत तसेच ते श्री सोमेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक देखील आहेत त्यांनी उभी हयातभर समाजाचे कार्य केले.ते समाजातील वाद-विवाद मिटविण्यासाठी नेहमी निष्पक्षपणे कार्यरत असायचे.त्यांनी आयुष्यभर समाजाचे देणें म्हणून आनंदाने कार्य केले ईशवरभक्तीत त्यांनी पूर्ण आयुष्य घालवले व तसेच गौर पंचक्रोशीत वारकरी संप्रदाय रुजविण्याचे कार्य केले. त्यांचा स्वभाव बोलका,मायाळू व प्रेमळ होता.ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.त्यांच्या पश्चात एक भाऊ,दोन मुले,एक मुलगी,नातू,पणतू असा परिवार आहे केशवराव पारवे यांचे थोरले बंधू होत लोकमतचे वार्ताहर व  सेवानिवृत्त कारकून नवनाथ पारवे व शिक्षक वैजनाथ पारवे (बापूराव सर) यांचे ते वडील होत.

त्यांच्या पार्थिवावर आज शनिवार दि.१५ मार्च २०२५ रोजी दुपारी ०२.०० वाजता त्यांच्या गौर येथील मळ्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.....

त्यांच्या आत्म्यास ईश्वर शाती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या