🌟भारताच्या पंतप्रधान पदावर सन २०२९ साली मी नाही तर नरेंद्र मोदीच राहतील.....!


🌟शिवसेना उबाठा गटाचे खा.संजय राऊत यांना प्रतिउत्तर देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले🌟

मुंबई :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उबाठा गटाचे खा.संजय राऊत यांना प्रतिउत्तर देतांना असे नमूद केले की २०२९ मध्ये मी नाही तर पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदीच विराजमान राहतील आज सोमवार दि.३१ मार्च रोजी नागपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी प्रतिउत्तर दिले.शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी म्हणून देवेंद्र फडणवीस राहतील असा दावा केला होता त्याला त्यांनी आज उत्तर दिले.

वयाची ७५ वर्षानंतर नेत्यांनी राजकारणापासून दूर व्हावे आणि नव्या पिढीला संधी द्यावी असे वक्तव्य यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता ७५ वर्षांचे आहेत. तर २०२९ पर्यंत ते ७८ वर्षांचे होणार आहेत. त्यामुळे आता हा नियम त्यांनाही लागू होऊन २०२९ साठी भाजप पंतप्रधान पदाचा नवा चेहरा शोधणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील असे सूचक वक्तव्य केले. यावर आता खुद्द फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे स्वतः सक्षम असून त्यांचा उत्तराधिकारी शोधण्याची कुठलीही गरज नाही. २०२९ मध्ये देश पुन्हा त्यांनाच पंतप्रधान म्हणून पाहण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य केले. सर्वांना विश्वासात घेऊन राज्याच्या कारभार सुरू आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी जे लोक आम्हाला मदत करतील त्या सर्वांना सोबत घेऊनच आम्ही काम करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सक्षम आहेत. त्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण नाही. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची कुठलीही गरज नाही. ते अजून बरेच वर्ष काम करू शकतात. २०२९ मध्ये पंतप्रधान म्हणून देश मोदींकडे पाहत आहे. वडील जिवंत असताना त्यांचा वारसदार शोधणे ही आमच्या देशाची परंपरा नाही. ही मुघली संस्कृती आहे आणि तसाही उत्तराधिकारी याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही, असेही फडणवीस म्हणाले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या