🌟मुंबई-नांदेड लोहमार्गावर प्रवाशांसाठी उन्हाळी विशेष गाड्यांच्या २४ फेऱ्या....!


🌟यामुळे मध्य रेल्वेमार्फत चालविण्यात येणाऱ्या उन्हाळी विशेष गाड्यांची एकूण संख्या आता ३५६ झाली आहे🌟

मुंबई : मुंबई-नांदेड लोहमार्गावरील उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेमार्फत विशेष गाड्यांची घोषणा होत आहे मध्य रेल्वे उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई आणि हुजूर साहेब नांदेड दरम्यान उन्हाळी विशेष गाड्यांच्या २४ अतिरिक्त सेवा चालवणार आहे.

यामुळे मध्य रेल्वेमार्फत चालविण्यात येणाऱ्या उन्हाळी विशेष गाड्यांची एकूण संख्या आता ३५६ झाली आहे शुक्रवार दि.२१ मार्च २०२५ रोजी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि हुजूर साहेब नांदेड दरम्यान उन्हाळी विशेष गाड्यांच्या २४ अतिरिक्त सेवा चालविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या