🌟राज्य सरकारसह केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय : गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी आता मोफत लस....!

 


🌟अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली🌟


मुंबई : महिलांना मध्ये मोठ्या प्रमाणात फैलावत असलेल्या गर्भाशयाच्या कर्करोगासह गुटखा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मोठ्या प्रमाणात मुखाच्या कर्करोग फैलावत असून गर्भाशयासह मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध लागावा याकरिता प्रतिबंधासाठी आता ९ ते १५ वयोगटातल्या मुलींना प्रतिबंधात्मक मोफत लस सरकारकडून देण्यात येणार आहे.

२ हजार २०० रुपयांची ही लस असून राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने त्यावर निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पॉप्युलेशन बेस्ड कॅन्सर व मोहिम स्वरुपात जनजागृती उपक्रम घेतले जात आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवार दि.०७ मार्च २०२५ रोजी विधान परिषदेत दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या