🌟नांदेड येथे गुढीपाडव्या निमित्त पतंजली नित्य योग साधकांची भव्य बाईक रॅली संपन्न.....!


🌟नांदेड भूषण योगाचार्य सिताराम सोनटक्के यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आ.बालाजी कल्याणकर यांच्या उपस्थितीत रॅली संपन्न🌟


नांदेड (दि.30 मार्च प्रतिनिधी)
- नांदेड येथील पतंजली योगपीठ हरिद्वार अंतर्गत चालणाऱ्या नित्ययोग,  शाखा भक्ती लॉन्सच्या वतीने हिंदू नववर्ष चैत्र गुढीपाडव्या औचित्य साधून प्रथमच शहरांमध्ये शेकडो योगसाधिका व साधकांनी योग जनजागृती बाईक रॅली काढली.


 योगाचार्य, नांदेड भूषण सिताराम सोनटक्के यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नांदेड उत्तर मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर, महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेड, उद्योजक अनिल शेटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही भव्य रॅली शहरातील भावसार चौक, तरोडा नाका, वर्कशॉप कॉर्नर, आयटीआय मार्गे गणेश नगरीतील श्रीराम मंदिर येथून मोर चौक, वामननगर तरोडा नाका व परत भक्ती लॉन्स मंगल कार्यालय येथे "करो योग, रहो निरोग," "हर घर जायेंगे, सब को योग सिखायेंगे ", "जय श्री राम," या घोषणेच्या निनादाने विसर्जित झाली.

गेल्या 14 महिन्यापासून पतंजली योगपीठ हरिद्वार अंतर्गत मालेगाव रोडवरील भक्ती लॉन्स येथे योगाचार्य सिताराम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली  निशुल्क योग वर्ग घेतले जातात. या नित्ययोग भक्ती लॉन्स च्या शाखे  मार्फत दर वेळेला विविध उपक्रम घेतले जातात आज गुढीपाडव्यानिमित्त पहाटे साडेचार ते साडेसहा नित्य योग साधना संपन्न झाल्यानंतर ही रॅली शहरातून  काढण्यात आली. विशेष म्हणजे या रॅलीत 200 च्या वर महिला बाईक स्वार योगसाधिकानी पारंपारिक नऊवारी वस्त्रे परिधान करून  व फेटे घालून मोठ्या  उत्साहात सहभाग नोंदवला. तर शेकडो पुरुष योगसाधकही या रॅलीत सहभागी होते.

     सदर बाईक रॅली यशस्वी करण्यासाठी पतंजली नित्ययोग शाखा भक्ती लॉन्सच्या सर्व पदाधिकारी सदस्य आणि साधकांनी परिश्रम घेतले.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या