🌟विधानसभेचे माजी विरोधीपक्षनेते तथा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळात मागणी🌟
🌟महाराष्ट्र पोलिस दलाने मनात आणले तर एकही गुटख्याची पुडी कोणी विकू शकत नाही🌟
मुंबई : महाराष्ट्र राज्यात गुजरात राज्यातून प्रचंड प्रमाणात मानवी आरोग्यास धोकादायक असलेल्या अवैध गुटख्याचे साठे येत आहे त्यामुळे अनेक लोक कर्करोगा सारख्या भयंकर आजाराने मरत आहेत राज्य सरकारने एकतर कडक कारवाई करावी किंवा गुटख्यावरील बंदी उठवावी अशी मागणी विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी अवैध गुटखा व्यापाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही, कडक कारवाई केली जाईल असे उत्तर यावेळी दिले.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी विधानसभेत गुटख्यावरून लक्षवेधी मांडली. त्यांनी म्हटले की, साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये 'महीम' नावाचा गुटखा आपल्या शेजारच्या राज्यातून येतो. सकाळी तीन ते पाच यादरम्यान आठवड्यातून दोन वेळेस मोठ्या प्रमाणात गुटखा येतो. हे खरे आहे का आणि असल्यास याच्यावर कारवाई का केली नाही. हिरानंदानी कॉलेजच्या परिसरात दहा मीटरवर पान स्टॉल सुरू आहे. या स्टॉलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विकले जातात, यावर कारवाई करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू आहे. इतर राज्यांमध्ये याला बंदी नाही. पोलिसांनी मनात आणले तर एकही गुटख्याची पुडी कोणी विकू शकत नाही. शासनाने कारवाई करावी किंवा ही बंदी उठवावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर गुटखा लॉबीला मदत करण्यासाठी आपण बंदी असे म्हणता का? असा सवाल अनिल साटम यांनी उपस्थित केला. यानंतर गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, गुटख्यावर कारवाई होत नाही असे नाही. गेल्या वर्षी आपण १५० कोटींपेक्षा जास्त गुटखा पकडला आहे. गुटखा व्यापाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही, कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
💫अवैध प्रतिबंधित गुटख्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल :-
विलास लांडे यांच्या मतदारसंघात फईम अहमद शेख नावाच्या व्यक्तीचे त्याच्या भावाच्या नावाने दुकान आहे. गुटख्याच्या विक्रीमध्ये या व्यक्तीला अगोदर अटक केलेली आहे. परंतु, हायकोर्टातून तडिपारी रद्द करण्यात आली. कोणीही अनधिकृतपणे व्यवहार करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. तुमच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे ती माहिती मला द्यावी, नक्कीच यावर कठोर कारवाई केली जाईल, असे गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले.
0 टिप्पण्या