🌟सावधान : आता तुमच्या सोशल मीडियावरही प्राप्तिकर विभागाचे लक्ष राहणार.....!

 


🌟तुम्ही केलेली परदेशवारी,महागड्या हॉटेलांची बुकिंग महागड्या कारसह बंगला व वस्तूंची खरेदी यावर राहणार लक्ष🌟

नवी दिल्ली : सावधान : आता तुमच्या सोशल मीडियावरही प्राप्तिकर विभागाचे लक्ष राहणार असून तुम्ही केलेले महागडे हॉटेलिंग,परदेशात केलेली मजा,महागड्या वस्तू,महागडी कार, नवीन बंगला,नवीन फ्लॅट आदींचे प्रदर्शन तुम्ही सातत्याने करत असल्यास आता सावध व्हा कारण तुमच्या सोशल मीडियावरही आता 'प्राप्तिकर विभागा'चे लक्ष असणार आहे. 

या खात्यांची झाडाझडती घेण्याचा कायदेशीर अधिकार १ एप्रिल २०२६ पासून प्राप्तिकर खात्याला मिळणार आहे. अनेकजण आपले खरे उत्पन्न लपवून कमी कर भरतात. पण, हे लोक आपला पैसा चैनीच्या वस्तू, ऐषोरामासाठी खर्च करतात. या श्रीमंतांना कर जाळ्यात ओढण्यासाठी प्राप्तिकर खाते सरसावले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या