🌟त्यामुळे कृषीमंत्री कोकाटे यांच्या मंत्रीपदासह आमदारकीला तुर्त अभय मिळाले आहे🌟
नाशिक :- महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेल्या दोन वर्षे कारावास व दंडाच्या शिक्षेला नाशिक जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली आहे त्यामुळे त्यांचे मंत्रीपद व आमदारकीला तुर्त अभय मिळाले आहे जिल्हा न्यायालयाकडून कोकाटेंना मोठा दिलासा मिळाल्याचे मानल्या जात आहे.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच बनावट दस्तावेजांद्वारे अल्प उत्पन्न गटातून शासकीय कोट्यातील सदनिका बळकावल्याप्रकरणात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी ५० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर ना. कोकाटे यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. दरम्यान काल विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाचा अंतिम निर्णय आल्यानंतर कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दल विचार केला जाईल असे सांगितले होते. आज नाशिकच्या सत्र न्यायालयात या प्रकरणी झालेल्या सुनावणीत माणिकराव कोकाटे यांना सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे कोकाटेंना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कोकाटेंचे वकील म्हणाले, शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणू न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो न्यायालयाने मंजूर केला आहे. कोकाटे बंधू यांच्या शिक्षेला अपील (कायदेशीर प्रक्रिया) चालेपर्यंत चालेपर्यंत स्थगिती दिली आहे. शिक्षेला स्थगिती मिळाली आहे. पण, कोकाटे अपात्र होणार का ? यावर वकिलांनी म्हटले, लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम ८/३ आहे, त्याची सध्या बाधा येणार नाही. या कलमाअंतर्गत दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास आमदार राहता येत नाही. मात्र, शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे कलम ८/३ हा याप्रकरमात लागू होणार नाही. दिलासा अपील चालू होपर्यंत लागू राहणार आहे.....
0 टिप्पण्या