🌟पानमसाला ब्रँड 'विमल'च्या जाहिरातप्रकरणी सुपरस्टार शाहरूख खानसह तीन अभिनेत्याना नोटीसा....!

 


🌟योगेंद्र सिंह यांनी केलेल्या तक्रारीनंतर जयपूरच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आदेश🌟


जयपूर : पानमसाल्यात केसर असल्याचा दावा करून ते खोटा प्रचार करत जनसामान्यांची फसवणूक केली जात असल्याने पानमसाला ब्रँड 'विमल'च्या जाहिरात प्रकरणी सिने अभिनेता शाहरूख खान,अभिनेता अजय देवगण आणि टायगर श्रॉफला नोटीस जारी करण्याचे आदेश जयपूरच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत.तक्रारदार योगेंद्र सिंह यांनी केलेल्या तक्रारीनंतर मंचाचे अध्यक्ष ग्यारसीलाल मीना आणि सदस्य हेमलता अग्रवाल यांनी बॉलिवूड मधील या तीन आघडीच्या अभिनेत्यांना नोटीस जारी करण्यास सांगितले पानमसाल्याची जाहिरात शुध्द फसवणूक करणारी असून पान मसाल्याच्या नावावर मानवी शरिरास अपायकारक गुटख्याची विक्री होत आहे पानमसाल्याच्या प्रत्येक दाण्यात केसर असल्याचा फसवा दावा केला जात आहे पानमसाल्यात केसर असल्याचा दावा करून कंपन्यांसह अभिनेते देखील खोटा प्रचार करत असल्याचा आरोप योगेंद्र सिंह यांनी केला. या फसव्या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली.

'बोलो जुबां केसरी' या टॅगलाइनची ही जाहिरात आहे. त्यात दावा केला की, पानमसाल्यात केसर आहे. हे पॅकेट उघडताच त्यातून केसर निघते. या जाहिरातीत शाहरूख खान, अजय देवगण व टायगर श्रॉफ दिसतात. या जाहिरातीवरून वाद झाल्यानंतर त्यांनी यातून अंग काढून घेतले. विमल इलायचीचा अक्षय कुमार हा ब्रँड अॅम्बेसिडर होता. सोशल मीडियावरून टीका झाल्यानंतर अक्षय कुमारने माफी मागून त्याने ब्रँड अॅम्बेसिडरपदाचा राजीनामा दिला. मी तंबाखूचे समर्थन करत नाही, तसेच त्याची जाहिरात स्वीकारत नाही, असे अक्षय कुमारने सांगितले होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या