🌟राज्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या प्लास्टिक आवरणावर अनुदानास शासन सकारात्मक मंत्री दादा भुसे यांची माहिती....!


🌟द्राक्ष उत्पादकांच्या समस्यांबाबत सदस्य रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता🌟


मुंबई : द्राक्ष फळ पीके संवेदनशील आहेत अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वादळ वारा यामुळे द्राक्ष फळ पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. द्राक्ष फळ पिकाच्या शेतीवर प्लास्टिक आवरण असल्यास होणारे नुकसान टाळता येऊ शकते. यासाठी शासन प्लास्टिक आवरणासाठी अनुदान देण्यास सकारात्मक आहे, असे मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

द्राक्ष उत्पादकांच्या समस्यांबाबत सदस्य रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य जयंत पाटील, दिलीप बनकर, विश्वजीत कदम यांनीही सहभाग घेतला मंत्री भुसे म्हणाले की शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन काही व्यापारी द्राक्ष माल खरेदी करतात. मात्र काही प्रकरणात शेतकऱ्यांना पैसे न दिल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात पोलीस कारवाई करण्यात येते. जुलै ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने नाशिकमधील द्राक्ष उत्पादकांचा झालेल्या नुकसानीपोटी १९३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच नोव्हेंबर ते डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या नुकसानीपोटी ९६ लक्ष रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातही या कालावधीत झालेल्या नुकसानीपोटी ८०५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या