🌟अज्ञात हल्लेखोरानी केलेल्या हल्ल्यात पाच भाविक जखमी🌟
अमृतसर : पंजाब राज्यातील येथील पवित्र तिर्थक्षेत्र श्री हरमंदीर साहिब येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर एका अज्ञात हल्लेखोराने लोखंडी रॉडने केलेल्या हल्ल्यात दर्शनासाठी आलेले ५ भाविक जखमी झाले आहेत या घटने संदर्भात शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने सांगितले की गुरू रामदास इन येथील कम्युनिटी किचन येथे ही घटना घडली.
या हल्ल्यात भटिंडा येथील तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर श्री गुरू रामदास इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ॲण्ड रिसर्च सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
💫घटनेतील हल्लेखोर गजाआड :-
या दुर्दैवी घटने संदर्भात पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की आरोपीला अटक केली असून त्याची ओळख अद्यापी जाहीर केलेली नाही. त्याचा साथीदार सुवर्ण मंदिरात आहे. दुसऱ्या आरोपीने भाविकांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीसोबत रेकी केल्याचा आरोप आहे.
0 टिप्पण्या