🌟महापुरुषांचा अवमानकारक उल्लेख करणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयात वकिलांनी दिला चांगलाच चोप....!

 


🌟कोल्हापूर न्यायालय परिसरात उडाली एकच खळबळ : न्यायालयाने कोरटकरला दिली दोन दिवसाची कोठडी🌟

कोल्हापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अवमानकारक उल्लेख केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरवर आज शुक्रवार दि.२८ मार्च रोजी कोल्हापूर न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त असतांना चक्क वकिलांनीच चांगला चोप दिल्याची घटना घडली या घटनेने कोल्हापूर न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली.

इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी कोल्हापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होत असतांना कोरटकर हा नागपूर येथील आपल्या घरी होता. शासनाने त्याच्या घरासमोर पोलीस बंदोबस्तही तैणात केला होता. घरासमोर पोलीस बंदोबस्त असतांना बरेच दिवस तो पोलीसांच्या हाती लागला नाही. शेवटी तेलंगणातून प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली होती. त्याच्या अटकेनंतर कोल्हापूर न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. 

या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे आज पुन्हा कोरटकरला मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी कोल्हापूर पोलीस घेवून आले होते. न्यायालयातील कामकाजानंतर एका वकिलाने प्रशांत कोरटकरला पोलीस बंदोबस्तात असताना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून पोलिसांनी वेळीच वकिलांना आवरल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर झालेल्या सुणावणीत न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. यापूर्वी न्यायालयाने कोरटकरला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे, आता ३० मार्चपर्यंत कोरटकरचा मुक्काम पोलिसांच्या कोठडीत असणार आहे. कोरटकरला पळून जाण्यासाठी कुणी कुणी मदत केली, ऑनलाइन पेमेंट कोणी दिलं, यासह आणखी तपास बाकी असल्याने पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकीलांच्या बाजूने करण्यात आली होती.

 प्रशांत कोरटकरला आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात केलं हजर करण्यात आलं होतं. यावेळी सरकारी पक्षातर्फे अॅड. सूर्यकांत पोवार तसेच, इंद्रजीत सावंत यांच्यातर्फे अॅड. असीम सरोदे हे ऑनलाइन पद्धतीने सुनावणीत सहभागी झाले होते. तर, प्रशांत कोरटकर याच्यातर्फेअॅड. सौरभ घाग प्रत्यक्ष उपस्थित होते. कोर्टामध्ये • युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर वकील अमित कुमार भोसले आले. ते या ठिकाणी कोर्टामध्येच आले होते आणि त्यांनी प्रशांत कोरटकरवर हल्ला केला. या आधीच कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी पोलिसांनी येऊ दिले नव्हते. पोलिसांनी कडेकडे बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र एक वकीलच या ठिकाणी आला जो मूळचे रुकडी मधले राहणारे आहेत. अमित कुमार भोसले असे त्यांचे नाव आहे. ते या ठिकाणी आले आणि त्यांनी ज्या ठिकाणाहून प्रशांत कोरटकरला बाहेर काढलं जातं, त्या ठिकाणी ते थांबले होते. पोलिसांनादेखील या ठिकाणी संशय आला नाही. कारण ते मुळात वकील आहेत आणि वकील असताना ते हल्ला करतील असं वाटलं नाही. महत्त्वाचं म्हणजे न्यायालयीन परिसरात आज खूप मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या