🌟पुर्णेत आयोजित टेनिस बॉल स्पर्धेत ताज फाउंडेशन क्रिकेट क्लब ठरला विजेता तर सँडी इलेव्हन हा संघ ठरला उपविजेता....!


🌟छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त करण्यात आले होते टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन🌟 

पुर्णा :- पुर्णा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित टेनिस बॉल स्पर्धेत ताज फाउंडेशन क्रिकेट क्लब विजेता तर सँडी इलेव्हन हा संघ उपविजेता ठरला आहे. 

पुर्णा येथील ऐतिहासिक आरआरसी मैदानावर माणूसकी फाउंडेशन च्या वतीने टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा घेण्यात आल्या अंतिम सामन्याचे उद्घाटन जगदीश जोगदंड यांच्या हस्ते करण्यात आले. अंपायर म्हणून नितेश जोंधळे व माधव अंभोरे यांनी काम पाहिले.  या सामन्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला याप्रसंगी व्यासपीठावर मुकुंद भोळे, जगदीश जोगदंड, संजय जल्लारे, चक्रवती वाघमारे, तुषार गायकवाड, राजकुमार सूर्यवंशी,  साहेबराव सोनवणे, सुरेंद्र नरवाडे, गजानन सरोदे, कुंदन ठाकूर, रवी गायकवाड, शत्रु भोळे आयोजक साकेत कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी विजेत्या संघाला चषक रोख पारितोषिक व  उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. प्रमुख उपस्थितात प्रशांत जावळे, जयकांत कांबळे, धैर्यशील जोंधळे, कृष्णा वाघमारे, वैभव काळे, सिद्धांत सोनकांबळे, सचिन कांबळे विशाल कांबळे यांचा समावेश होता स्पर्धेचे प्रायोजक रवी कांबळे, मिलिंद कांबळे, मुकुंद भोळे होते. आयोजक साकेत कांबळे यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या