🌟हा धार्मिक सोहळा रविवार ३० मार्च ते ०६ एप्रिल या कालावधीत होणार आहे🌟
यंदाही हा सोहळा श्री ब्रह्मीभूत ह.भ.प. संत मोतीराम महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि श्री संत मारोतराम महाराज व श्री गुरुवर्य दाजी महाराज यांच्या कृपेने आयोजित करण्यात आला आहे. सर्व भाविक भक्तांना समाज प्रबोधन व्हावे,अध्यात्मिक लाभ मिळावा, भागवत धर्माचे जागरण व्हावे आणि जनकल्याण घडावे हा या सोहळ्याच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.
श्रीमद् भागवत कथेला वेदशास्त्रसंपन्न भागवताचार्य हरिभक्तीपरायण श्रीप्रणव शास्त्री -धानोरकर (आळंदी, देवाची) यांच्या मुखारविंदातून होणार आहे. तरी सर्वांनी एकदा कथेचा अवश्य लाभ घ्यावा. तसेच यामध्ये ह.भ.प. माणिक महाराज गंगाखेडकर, नंदकिशोर महाराज अजरसोंडकर, शितलताई देवकते, जनार्धन महाराज आळंदीकर, पंकज महाराज धोरे, पवन महाराज आलेगावकर आणि बाळकृष्ण महाराज गढदे यांसारखे कीर्तनकार भक्तिरसात रंगतदार प्रवचने व कीर्तन करणार आहेत. विविध भजनी मंडळे आणि अनुभवी गायक, वादक सोहळ्यात रंगत आणणार आहेत. ६ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ ह.भ.प. राम महाराज खोरसकर यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांना मिळणार आहे. या भव्य सोहळ्याला भाविक भक्तांनी उपस्थित राहून श्रीराम नामस्मरण व भक्ति मार्गाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम मंदिर समिती व समस्त गावकरी मंडळींनी केले आहे.
फोटो- श्रीप्रणव शास्त्री धानोरकर आळंदी
0 टिप्पण्या