🌟महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या अपडेट/ हेडलाईन्स /बातम्या.....!


🌟धनंजय मुंडेंसह 10 जणांना सहआरोपी करा धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडला सरेंडर करायला लावलं - अंजली दमानिया 

✍️ मोहन चौकेकर

1. उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प;  बजेटमध्ये 36 हजार कोटींची तरतूद, पण लाडक्या बहिणींना 2100 रुपये नाहीच; उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवारांनी विधानसभेत सांगितलं बजेट 

2. कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद; अजितदादांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस  ; आग्र्यात छत्रपतींचे स्मारक तर मुंबईत अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक, राज्यात 10 मोठ्या स्मारकांची घोषणा, कोट्यवधी रुपयांची तरतूद

3. विधानभवानात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे  समोरासमोर,मात्र दोघांनिही एकमेकांकडे पाहिलेही नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरेंचे मात्र हस्तांदोलन ; बजेट सादर झाल्यानंतर अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; म्हणाले, दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला 

4. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर अर्थसंकल्पात काय ? अर्थमंत्री अजित पवारांच्या महत्त्वाच्या 12 घोषणा, AI चे हायटेक सेंटर स्थापन करणार ; मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी,  राज्य सरकारच्या बजेटवर उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र 

5. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी-मार्चचे मिळून 3000 रुपये कधीपर्यंत मिळणार? आदिती तटकरेंनी अपडेट सांगितली, 12 मार्चपर्यंत पैसे जमा होणार ; कांद्याचा प्रश्न ताबडतोब सोडवा, छगन भुजबळ विधानसभेत आक्रमक, पणन मंत्र्यांचा निर्णय; आमदारांच्या सुचनांचा प्लॅन घेऊन सहकारमंत्री अमित शाहांना भेटणार 

6. आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेटची योजना आणणार, हिंदू खाटीकांसाठी मंत्री नितेश राणेंचं नवं धोरण ; जेजुरी देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, मराठमोळा पोशाख हवा 

7. धनंजय मुंडेंसह 10 जणांना सहआरोपी करा, धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडला सरेंडर करायला लावलं; अंजली दमानिया म्हणाल्या, माझ्याकडे पुरावे आहेत ; खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावर विनयभंग अन् अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, खोक्याच्या नातेवाईकानेच दिली फिर्याद ; ठाण्यात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांच्या पुतण्यावर अत्याचाराचा गुन्हा; महाविद्यालयीन विद्यार्थिनीला लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार, गर्भपातही करायला लावला 

8. गंगाजलच्या वक्तव्यानंतर नितेश राणे कडाडले, म्हणाले, राज ठाकरेंना फक्त हिंदू धर्म दिसतो, बकरी ईदला मोहम्मद अली रोडवर वाहणारं लाल पाणी दिसत नाही ; राज ठाकरेंच्या डेअरिंगला सलाम, त्यांना मानाचा मुजरा; कुंभमेळ्याबाबतच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांकडून कौतुक 

9. पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, रवींद्र धंगेकर 'हाता'ची साथ सोडणार; लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेणार ; पुण्यातील धनिकपुत्र गौरव अहुजाने माफी मागताना उल्लेख केलेले 'शिंदे साहेब' नेमके कोण? चर्चांना उधाण 

10. 'शब्द जरा जपून वापरा' टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक सुनिल गावसकरांवर भडकला, शारजाहचा किस्सा सांगितला ; निवृत्तीबात रोहित शर्मा स्पष्टच बोलला; जे काही आहे ते सुरु राहील, अफवांना हवा देऊ नका, मी वन डेतून आत्ताच निवृत्त होणार नाही                            

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या